जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव शिवारात गट क्रमांक 115 येथे लिलाबाई अंबादास सूर्यवंशी वय 65 वर्ष या मक्का पिकास खत टाकत असताना अचानक रानडुकराने पाठीमागून त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याचा मुलगा श्री दिलीप अंबादास सूर्यवंशी व सुन सौ.कमलबाई दिलीप सूर्यवंशी या दोघांनी त्यांना शेताबाहेर आणून शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन त्यांच्यावर प्रथमोपचार केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र शिऊर येथील डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांना संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात उपचार घेण्यास पाठवण्यात आले. या घटनेमुळे बळ्हेगावच्या परिसरात शेतकरी, महिला, शाळेतील मुलं,शेत मजूर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वन विभागाने या रानटी डुकरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा