गुरुंविषयी आदर व्यक्त करण्यासाठी दिला जातो पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गुरू प्रमाणे नेहमी मार्गदर्शन करणारे,दिशा दाखवणारे , समाजात उल्लेखनीय कार्य करणारे,यांना हा पुरस्कार देण्यात आला. आई वडील हे आपले पहिले गुरू ,नंतर आपल्याला शिकवणारे शिक्षक ,मग क्षेत्र कोणतेही असो ,जे आपल्याला मार्गदर्शन करतात,योग्य दिशा दाखवतात,त्यांना आपण गुरूचे स्थान देतो.अशा गुरुंविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ,हा पुरस्कार दिला जातो.
या कार्यक्रम मध्ये शितोळे करियर अकॅडमी मध्ये पोलिस भरती साठी प्रशिक्षण घेत असणारे विद्यार्थी यांनी गुरु चे स्थान किती जीवनात महत्वाचे असते याबाबत मनोगते व्यक्त केली. तसेच उपस्थित सर्वच पुरस्कार प्राप्त यांनीही खूप छान,जीवनाला कलाटणी देणारे मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री रविंद्र धनक सर , ह. भ. प. विलास महाराज पवार,श्री संजय शितोळे सर -- शितोळे करियर अकॅडमी संचालक,श्री भाऊसाहेब धावडे ,श्री आनंदराव रासकर यांना ट्रॉफी,पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गुरुरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री केशव शिंदे - ग्रा.सदस्य अण्णापूर ,पवार मॅडम, डॉ.वैशाली साखरे,अश्विनी नरवडे,रुपाली बोर्डे,राधिका ताई आदी मान्यवर उपस्थित होते. श्री शंकर रासकर ग्रा.सदस्य अण्णापूर तसेच शितोळे करियर अकॅडमी ,शिरूर यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा - राणी कर्डिले यांनी केले.संस्थेचा वतीने आभार श्री केशव शिंदे यांनी मानले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा