माजी सरपंच अनिल मांढरे यांचा आत्मदहनाचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
माजी सरपंच अनिल मांढरे धावडी व ग्रामपंचायत सदस्य धावडी यांनी धावडी येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मनीषा बोडके यांच्या विषयी गेले कित्येक महिनेतक्रार अर्ज दिले असता सदरच्या अर्जावर संबंधित गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी वेळोवेळी अर्ज व पत्रा पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारचे अद्याप कारवाई केलेली नाही तसेच विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायतीची कसलीही आजपर्यंत तपासणी केली नसून ग्रामसेवक यांना ते पाठीशी घालत आहे
वरील तक्रारी या दि. 25 ऑगस्ट 2023 ते 26 एप्रिल 2024 आणि 30 ऑगस्ट 2024 ते 21 मार्च 2025 व 19 मे 2025 अशा प्रकारे लेखी तक्रार व जोडपत्र प्रमाणे माहिती मिळत नसल्याने मी अनिल मांढरे दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी पंचायत समिती वाई येथे आत्मदहन करणार असून नमूद माहितीही अर्ज प्रमाणे 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मिळावी अन्यथा मी आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा पोलीस अधीक्षक सहकार्यालय सातारावाई पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय वाई गटविकास अधिकारी पंचायत समिती वाई तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
----------------------------
----------------------------
*
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा