महाआरोग्य शिबीरास उत्फुर्त प्रतिसाद - किसनवीर कारखान्याची व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाई येथील मार्केट कमिटीतील शेतकरी सभागृहात झालेल्या महाआरोग्य शिबीरास वाईसह इतर परिसरातील जनतेने उत्फुर्त प्रतिसाद दिला असून यामध्ये जवळपास ७०० जणांची तपासणी झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी राष्ट्रवादी यवक कॉग्रेस, मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शेंद्रे- सातारा येथील ऑन्को लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व वाई येथील ग्रामीण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर, रक्तदान, मोफत मोतीबिंदु निदान शिबीर, नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटपाचे आयोजन केलेले होते. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या शिबीरास सकाळपासुन वाईसह जवळपासच्या गावातील बहतांश रूग्णांनी सहभाग घेऊन काही रूग्णांना तिथेच उपचार मिळाले तर काहींना हॉस्पिटलकडुन पुदील उपचाराकरिता सेवा देणार असल्याचेही सांगण्यात आले. यामध्ये ब्लडप्रेशर, शुगर, डोळे तपासणी, चष्मे वाटप, मोतिबिंदु ऑपरेशन, कॅन्सरच्या विविध तपासण्या, ई. सी. जी., अन्जोग्राफी, मेंदूतील गाठीचे ऑपरेशर, पंचकर्म इत्यादी सर्वाची तपासणी करण्यात आलेल्या होत्या. ७०० गरजुंनी यामध्ये भाग घेतलेला होता. रक्तदान करण्याच्या रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तुचे वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीरास राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील यांनीही भेट देऊन माहिती घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबाबत संयोजकांचे आभार मानले. वाई येथील ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळवाटप करून ५० लाभार्थी दिव्यांगांनाही मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
वाई मार्केट कमिटीचे चेअरमन मोहन जाधव, व्हाईस चेअरमन विलास येवले, किसन वीर काखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, रामदास इथापे, प्रतापराव पवार, संजय लोळे, अनिल सावंत, दासबाबु गायकवाड, शुभम पवार , भुषण गायकवाड, मनिष भंडारे, प्रदिप चोरगे, यशवंत जमदाडे, बाळासाहेब चिरगुटे, भैय्यासाहेब डोंगरे. नारायण जाधव, चरण गायकवाड, श्रीकांत सावंत, सुनिल शिंगटे, दादासाहेब शिंदे, राजुकाका भोसले, नितीन निकम, ॲड रविंद्र भोसले, मदन भोसले, भरत खामकर, राजेश गुरव, राजंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, अमृत गोळे, विकास बाबर, प्रणित पिसाळ, सचिन शिंदे, संदिप डोंगरे, मामा देशमुख, अभय पोफळे, कृमार जगताप, मयुर चव्हाण, नाना चिकणे, सुनिल फणसे, रविंद्र इथापे, संपत महांगडे, नितीन मांढरे यांनी आरोग्य शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.
----------------------------
----------------------------
----------------------------
----------------------------
*
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा