20 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
मुंबईहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या KA 01AQ 0557 क्रमांकाच्या ट्रकला खंबाटकी घाटात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली दिनांक ५ जुलै रोजी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ट्रकला आग लागल्याचे कळताच ट्रक चालक शकील आलम व मालक अमन कुमार यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबून गाडीतून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. अग्निरोधक यंत्राच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण वाऱ्यामुळे आग भडकत गेली.
या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गाडी आणि त्यातील सामान जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रदर्शनात असणाऱ्या स्टॉलचे साहित्य घेऊन हा ट्रक मुंबई हुन बेंगलोर कडे निघाला होता.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा