पाणी साठवणुकीची ठिकाणी तपासून उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवल्या
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील मालदपूर मध्ये हिवताप प्रतिबंधासाठी जनजागृती सर्वे अंतर्गत पाणी साठवणुकीची ठिकाणी तपासून उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्यात आल्या यावेळी घरोघरी आरोग्य शिक्षण दिले गेले वाई पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या राष्ट्रीय कीटक ज्यानी रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून व जुलै महिन्या हिवताप प्रतिबंध महिला म्हणून साजरा केला जातो
या पार्श्वभूमीवर मालदपूर ता. वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून एक जुलै 2025 रोजी गावामध्ये व्यापक कंटेनर सर्वे व जनजागृती मोहीम राबवण्यात आली मालदपूर गावची लोकसंख्या सुमारे 3000 असून या संपूर्ण गावात आरोग्य सेवक आरोग्य सेविका व अशा आरोग्य सहाय्यक यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भोईटे व डॉक्टर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमातून प्रत्येक घरी भेट देत कंटेनर सर्वे करण्यात आला या नागरिकांना हिवताप व इतर कीटकजन्य रोगांपासून संरक्षणासाठी स्वच्छता नियमित पाण्याचा वापर गमले झाकून ठेवणे डासांची पैदास होऊ नये यासाठी काळजी घेणे इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले या मोहिमेमुळे गावात हिवताप रोगासारख्या रोगाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून गावकऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा