दहा विद्यार्थ्यांनी पटकावली विविध पदके
शिवशाही शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतील विद्यार्थ्यांना ब्रिलियंट पब्लिकेशन आयोजित जूनियर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत असे यश मिळाले ही परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्वर व ब्राँझमेडल प्राप्त झाले.
गोल्ड मेडल प्राप्त झालेले विद्यार्थी
1. जेधे राधेय
2. निर्मळ श्वेताली
3. पिंगळे सेजल
सिल्वर मेडल मिळालेले विद्यार्थी
1. धमढेरे सई
2. भुजबळ समृद्धी
3. थोरात यशदा
ब्राँझ मेडल प्राप्त झालेले विद्यार्थी
1. लवांडे मानसी
2. बीरभाऊ महेश्वरी
3. बोरावके आर्या
4. घुले स्वयम
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे उपशिक्षक रवींद्र सातपुते यांनी उत्तम मार्गदर्शन केले.
या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार, गुजर मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा