शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीतील 15 व आठवीतील 14 विद्यार्थी पात्र
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
2024-25 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेले आहे. इयत्ता पाचवीतील स्वराज्य ज्ञानेश्वर जाधव या विद्यार्थ्यांने 250 मार्क मिळवून जिल्ह्यात क्रमांक काढण्याचा बहुमान मिळवलेला आहे तसेच इयत्ता पाचवीतील 15 विद्यार्थी पात्र झालेले आहेत तसेच इयत्ता आठवीतील एकूण 14 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. तसेच यावर्षी सैनिक स्कूलची जी एंट्रन्स परीक्षा झाली त्या परीक्षेत इयत्ता सहावीतील रुद्र संदीप मोरे आणि इयत्ता पाचवीतील स्वरा अतुल साबळे या दोघांनाही मेरिटनुसार सैनिक स्कूलमध्ये प्रवेश प्राप्त झाला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे माननीय मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे विभागीय अधिकारी श्री जगदाळे एन. आर. साहेब, जेष्ठ शिक्षक लाईफ वर्कर श्री दिघे ए.आर. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समितीआणि सर्व पंचक्रोशीतर्फे त्या दोघांचं खूप खूप अभिनंदन करण्यात आलं. पाचवीला शिकवणारे सर्व शिक्षक आठवीला शिकवणारे सर्व शिक्षक या सर्व शिक्षकांचे सुद्धा सगळ्यांकडून अभिनंदन करण्यात आलं. मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून शिष्यवृत्ती पात्र झालेले आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्यच वाटप करण्यात आले तसेच शिक्षकांचे ही कौतुक करण्यात आले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा