अहोरात्र कष्ट घेऊन आषाढी वारी निर्विघ्न पार पाडल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी हुसेन मुलाणी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार यावर्षी आषाढी वारी नियोजनाची जबाबदारी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिशय चोखपणे पार पाडली आहे. आषाढी वारी काळात स्वच्छता, वारकऱ्यांना राहण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, पत्रा शेड रिद्धी सिद्धी दर्शन मंडप, पिण्याचे पाणी, इत्यादी सर्वच बाबतीत अतिशय सूत्रबद्ध नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पडली.
आषाढी वारीला साधारणपणे पंधरा लाखाच्या आसपास भाविक येतात. परंतु यावर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे शेतकरी वर्ग पेरण्या उरकून वारीला आला होता. त्यामुळे यावर्षी आषाढी वारीला 25 लाखापेक्षा जास्त वारकरी आले होते. तरीदेखील या वारीमध्ये अतिशय योग्य नियोजन दिसून आले. प्रशासकीय पातळीवरून वारकऱ्यांना सर्व सेवा सुविधा पुरवण्यात आले होत्या. पार्किंगची योग्य व्यवस्था केल्यामुळे वारी परतीच्या वेळी वेळी होणारी वाहतुकीची कोंडी देखील झाली नाही. या सर्वच पातळीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी योग्य नियोजन केल्याचे जाणवले. त्यामध्ये त्यांना प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, या सर्व अधिकार्यांचे सहकार्य लाभले.
आषाढी वारीत 25 लाखापेक्षा जास्त वारकरी भाविकांची संख्या असून देखील वारीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार न करता योग्य नियोजन करून वारी निर्विघ्न पार पाडल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनात संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच प्रांत अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा शाल, पुष्पहार, व पुस्तकांचा संच देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे, शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, तालुकाध्यक्ष तानाजी जाधव, तालुका उपाध्यक्ष नामदेव लकडे, अजित देशपांडे, सोहन जयस्वाल, दिनेश खंडेलवाल, उपस्थित होते.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा