सर्वसामान्य घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी राहुल वाळके यांना निवडीचे पत्र दिले आहे . राहुल वाळके यांनी विविध सामाजिक कामे करत दिव्यांग बांधवांसाठी विशेष कार्य केले असून प्रहार कार्यकर्ता, तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष इत्यादी ठिकाणी काम केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्ते तसेच दिव्यांग बांधवांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, यापुढेही अधिक जोमाने सर्वसामान्य घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे यावेळी एडवोकेट राहुल वाळके यांनी सांगितले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा