दुबई येथे झालेल्या सौंदर्यस्पर्धेत शेगावची गायत्री रोहनकर ठरली मिस एशिया वर्ल्ड 2025 विजेती

शेगावसह भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर केले उज्ज्वल

Miss Asia world 2025, gayatri rohankar, India, Maharashtra, Buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख) 

भारताच्या वतीने सौंदर्य, आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता यांचा ठसा उमटवत शेगावच्या गायत्री रोहनकर हिने ब्रिस्टोल हॉटेल देरा, दुबई  येथे,22 जून रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत ‘मिस एशिया वर्ल्ड 2025’ हा किताब पटकावला आहे. या यशामुळे गायत्रीने केवळ शेगावचेच नाही, तर संपूर्ण भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

 

या स्पर्धेत आशियातील विविध देशांतील ४० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. विविध फेऱ्यांमधून पारख करण्यात आलेल्या स्पर्धकांमध्ये गायत्रीने आपली बुद्धिमत्ता, सौंदर्य, सामाजिक भान आणि संवादकौशल्य यांमुळे परीक्षकांची मने जिंकली.

गायत्री रोहनकर (gayatri rohankar) ही मूळची बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील असून तिचे प्राथमिक शिक्षण स्थानिक विद्यालयात झाले. तिने इंजिनीअरिंगनंतर मॉडेलिंगमध्ये आपले करिअर घडवले. सौंदर्याच्या जोडीने तिने सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला असून, ग्रामीण भागातील मुलींसाठी ‘उज्ज्वला’ या नावाने आरोग्य व शिक्षण विषयक उपक्रम राबवले आहेत.

स्पर्धेतील अंतिम फेरीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गायत्री म्हणाली, “आधुनिक युगात सौंदर्य ही फक्त देखाव्यापुरती गोष्ट नसून, ती एक जबाबदारी आहे. सौंदर्य म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात आशा निर्माण करणारी प्रेरणा.” तिच्या या विचारशील उत्तराने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले आणि  एकमताने तिला ‘मिस एशिया वर्ल्ड 2025’चा (Miss Asia world) किताब बहाल केला प्रसिद्ध सिने अभिनेत्री मिस वर्ड अदिती गोवात्रीकर यांच्या हस्ते तिच्या डोक्यावर विजयाचा ताज ठेवण्यात आला. यावेळी सर्व सभागृह टाळ्यांनी दणाणून गेले गायत्रीने आपल्या कुटुंबीयांचे,  देशवासीयांचे आभार मानले. तिने सांगितले की, “माझं हे यश माझ्या गावासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी आहे. मला अभिमान वाटतो की मी ग्रामीण भागातून येऊन आज आशियातील सर्वोच्च सौंदर्यस्पर्धा जिंकली आहे.”

गायत्रीच्या या ऐतिहासिक यशावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. शेगावमध्ये तिच्या घरी आणि परिसरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. गायत्री रोहनकरने यापूर्वीही विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !