रोड मॉडेल व्हिलेजच्या दर्जेदार पंचसुत्रीचे लवकरच अनावरण - महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे

शिव पाणंदची रोड मॉडेल व्हिलेज संकल्पना देशभर पोहचवणार - शरद पवळे

Role model village, shivpanand shetraste, sharad pawale, vaijapur, sambhaji nagar Aurangabad, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी) 

शिव पाणंद शेतरस्ता चळवळ अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी नारायणगव्हाण शिवरस्त्याच्या संघर्षापासुन सुरू झाली प्रशासकीय कार्यालयात न्याय न मिळाल्यामुळे न्यायालयलाचे दार ठोठावे लागले हे करत असताना  पारनेर तालुक्यात अनेक शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांना संघटीत करत वेळोवेळी तहसिल कार्यालयावर आंदोलने केली या आंदोलनात जोपर्यंत माझ्या शेवटच्या भावाला दर्जेदार शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही चळवळीने महासंकल्प केला असुन तालुका प्रशासणा कडून वेळोवेळी अवमान करण्यात आला. 

पारनेर तहसिलवरील पेरू वाटप आंदोलनातील पेरू तहसिलदारांनी फेकून दिले यामुळे न्यायालयाचे  दार ठोठावण्यात आले छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात ॲड. प्रतिक्षा काळे यांनी प्रभावी बाजु मांडली व हायकोर्टाने ६० दिवसांच्या आत शेतरस्ते खुले करण्याचे आदेश तहसिलला दिले परंतु तहसिलदारांनी केराची टोपली दाखवली यानंतर जिल्ह्यातील नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा ,राहूरी शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यांमधील शेतकऱ्यांना जोडण्याचे काम केले जिल्हाधिकार्यालयावर भव्य पेरू वाटप आंदोलन केले त्यानंतर कर्तव्यदक्ष  जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबविले व शासण निर्णयाच्या आदेशाप्रमाणे मोफत संरक्षण मोफत मोजणीचे आदेश तालुका प्रभासणाला दिले. 

त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे जिल्हयातील तहसिल कार्यालयां समोर" चले जाव " आंदोलन केले व शेवटी तहसिलदारांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली असुन लवकरच त्याचा निर्णय होणार असुन तालुका, जिल्हा प्रशासकीय कार्यालयांमध्ये विविध आंदोलने करत राज्यभर जनजागृती केली यामध्ये चळवळीच्या अनेक पदाधिकाऱ्यांन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोलाचे योगदान त्यानंतर राज्यव्यापी आंदोलनाच ईशारा देताच सरकारची सकारात्मक भुमिका यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असुन सरकार प्रशासनाची निर्णयांच्या अंमलबजावणीवर अंवलंबून न राहता राज्यात नव्या पर्वाची सुरुवात करत राज्यभर रोड मॉडेल व्हिलेज अभियानाचा शुभारंभ केला असून लवकरच स्मार्ट व्हिलेजेस उभी करण्यासाठी रोड मॉडेल व्हिलेजची पंचसुत्री बनवून लवकरच अनावरण करण्यात येणार आहे. 

पुढील काळात चळवळीच्या संदर्भातील विस्तृत माहीत सादर केली जाईल शेतकऱ्यांना चळवळीच्या माध्यमातून न्याय देणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याची सर्वस्वी जबाबदारी पूर्ण केली जाईल अंतिम श्वासापर्यंत परमेश्वरानंतर दुसर रूप असणाऱ्या शेतकरी राज्याच्या पुढच्या पिढीसाठी अर्पण करणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांचे आभार महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी मत व्यक्त केले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !