श्रावण महिना व नागपंचमी निमित्त महिलांना मिळणार मनोरंजनाचे क्षण
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट शेटफळ यांच्यावतीने श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या पवित्र सणाच्या निमित्ताने खास शेटफळ आणि परिसरातील महिला भगिनींसाठी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध, महिलांचा आवडता कार्यक्रम सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांच्या होम मिनिस्टर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.
सदर कार्यक्रमांमध्ये अनेक मनोरंजक खेळांबरोबर महिलांसाठी एकूण 25 आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये प्रथम बक्षीस मानाची पैठणी, द्वितीय बक्षीस इलेक्ट्रिकल केटल, तृतीय बक्षीस डिनर सेट, त्याचबरोबर प्रोत्साहन पर बक्षिसे ठेवलेली आहेत.
हि स्पर्धा बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी सायंकाळी सात वाजता सिद्धेश्वर मंदिराशेजारी संपन्न होणार आहे. तरी शेटफळ व परिसरातील सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट शेटफळ यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
----------------------------
----------------------------
----------------------------
----------------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा