धावडा परिसरात अवैध मुरुम उत्खनन - तलाठी व तहसीलदार यांचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष
*
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन (प्रतिनिधी मजहर पठाण)
भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुमाचे उत्खनन जेसीबीने सुरू आहे. महसुल विभागाचे व तहसीलदाराचे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले जात आहे. शासनाचा मोठा महसुल बुडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
धावडा परिसरात भर दिवसा विविध भागातुन शासकीय जमीनीचे जेसीबीने खोदकाम करुन मुरुमाचे अवैध वाहतूक सुरू आहे. तसेच यावेळी भोकरदन चे तहसीलदार यांच्याशी यानी सपर्क केला असता त्यांना फोन उचलला नाही. त्यानंतर धावडा चे तलाठी किशोर राजपूत यांच्याशी संपर्क केला असता त्यांना सांगितले की मी पथक पाठवतो आणि कारवाई करतो पण आता लोक कसलंही कारवाई त्यांनी केली नाही.
ट्रॅक्टर आणि जेसीबी वाले सागतात आम्ही तहसीलदार आणि तलाठीला हप्ता देतो. तुम्हाला काय करता येईल ते करा. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. अशी भाषा ट्रॅक्टर आणि जेसीबी वाले स्थानिक नागरिकाना करत आहेत.
या अवैध मुरुम वाहतुक माफियांवर कायदेशीर कारवाई होईल का? अशी सर्वसामान्य नागरिकामधून विचारणा होत आहे.
----------------------------
----------------------------
----------------------------
----------------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा