जादूचे प्रयोग मनोरंजनातून शिक्षणाकडे जाण्याचा अप्रतिम मार्ग

मनसे नेते मंगेशभैय्या शिंदे पाटील

Magic experiments education through entertainment, Magic show in school, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण) 

रांजणगाव येथील श्री रंगदासस्वामी शिक्षण विकास मंडळ, आणे संचलित श्री शिवाजी माध्य.व उच्च माध्य.विद्यालय  येथे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनचे राज्य उपचिटणीस श्री. मंगेशभैय्या शिंदे पाटील यांच्या तर्फे गावांतील सर्व शाळांसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार प्रकाश शिराळे यांच्या जादूचे प्रयोग कार्यक्रमाचे व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. अविनाश पवार यांच्या शुभहस्ते पार  पडले.याप्रसंगी गावातील शिंदे मळा ,धाडगेवाडी व हंगेश्वर वस्तीवरील सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी होते

कार्यक्रमाचे उदघाटक मनसे नेते श्री.अविनाश पवार यांनी "विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी,वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा विश्वास व्यक्त केला तसेच सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक श्री. मंगेशभैय्या शिंदे पाटील यांनी "जादूचे प्रयोग मनोरंजनातून शिक्षणाकडे जाण्याचा अप्रतिम मार्ग आहे"  असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर "विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बनविण्यासाठी भक्कम व्यासपीठ सदैव उपलब्ध करू" असा विश्वास व्यक्त केला. 

यावेळी राजंणगाव मधील सर्व शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता पुर्ण यशाबद्दल  कु.सायली साबळे, कु. वैभवी शिंदे , कु.श्रावणी उदार, कु.समृद्धी गायकवाड, कु.सिद्धी शिंदे, कु.राहुल मेहेत्रे, कु.ओम गाढवे, कु.प्रियंका गाढवे, कु.प्रांजल वाघ, कु.काव्या शिंदे, कु.दिव्या जवक, कु.समृद्धी तागड, कु.गौरी शेटे, कु.पूनम सरोदे यांचा व उंच क्रीडा प्रकारात मिळविलेल्या यशाबद्दल कु.कादंबरी साबळे व कु. गौरी शेटे यांच्या सह विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या उपस्थित सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

सुप्रसिद्ध जादूगार श्री. प्रकाश शिरोळे यांनी जादूचे प्रयोग दाखवत सर्वांना मंत्रमुग्ध केले. विज्ञान, संमोहन, हातचलाखी यांचा अप्रतिम संगम असणारे प्रयोग दाखवत कार्यक्रमाची उंची वाढवली अंधश्रद्धा निर्मूलन, मुली वाचवा, मुली जगवा असा सामजिक संदेश देत सामजिक भान जपले. कार्यक्रमाचे संयोजक श्री.अरुण वाळुंज यांनी कार्यक्रमाचे आयोजक मनसे नेते मंगेशभैय्या शिंदे पाटील यांनी केलेल्या अप्रतिम आयोजनाबद्दल व सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले 

 

याप्रसंगी मनसे तालुका सचिव श्री. नारायण नरोडे, मनसे सुपा शहर अध्यक्ष श्री.अक्षय सुर्यवंशी, यासह मनसेचे विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते श्री.किशोर जाधव, श्री.अतिष सूर्यवंशी, श्री. तुषार बोरगे, श्री.शैलेश हटाळे, श्री.रुपेश हटाळे यासह रांजणगाव मधील सर्व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विकास बनकर सर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व शाळा एकत्रित करून कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

----------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

----------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

----------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

----------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !