शिरूर पोलिस निरीक्षकांच्या हस्ते व्यापारी व पत्रकारांचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
अखिल एकता उद्योग व्यापार मंडळ शिरूर यांच्या वतीने दानवीर भामाशाह यांची जन्म जयंती, शेतकरी दिन व डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या विशेष प्रसंगी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते शिरूर शहरातील व्यापारी बांधव व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात दानवीर भामाशाह यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्यांचा उल्लेख करताना नितीन भंडारी यांनी त्यांचे महाराणा प्रताप यांच्यासाठीचे योगदान उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडले. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी आपल्या मनोगतातून समाजातील व्यापारी, शेतकरी, डॉक्टर आणि पत्रकार वर्गाच्या कार्याची प्रशंसा करीत शुभेच्छा दिल्या.
दानवीर भामाशाह हे मेवाडच्या महाराणा प्रताप यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार व मित्र होते. हल्दीघाटीच्या युद्धानंतर महाराणा प्रताप निराश झाल्यानंतर भामाशाह यांनी त्यांना इतकी संपत्ती अर्पण केली की २५,००० सैनिकांचे १२ वर्षांचे पालनपोषण शक्य झाले. त्यांच्या कुटुंबाने तीन पिढ्यांपर्यंत मेवाडच्या प्रशासनात योगदान दिले. त्यांनी दिलवाडा जैन मंदिराचे बांधकाम केले असून त्यांचे स्मरण म्हणून भारत सरकारने २००० साली तीन रुपयांचे टपाल तिकीटही प्रकाशित केले आहे.
या कार्यक्रमास योगेश पिपाडा, गणेश चंदन, प्रकाश चोपडा, सागर चव्हाण, केशव लोखंडे, मनोज साखला, आदेश बोरा, रंजीत राजपुरोहित, अशोक चौधरी, रामभाऊ इंगळे, विजय नरके, सुनील जोशी, राजीव चोंदे, आनंद दिवटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा