पंढरपूर एम.आय.डी.सी मध्ये उद्योग करण्यासाठी उद्योजकांनी प्रस्ताव पाठवावे - आमदार समाधान आवताडे

कासेगाव हद्दीत एमआयडीसी होणार; उद्योजक क्षेत्रासाठी उद्योजकांनी मागणी करावी

MIDC pandharpur, MLA samadhan autade, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत खाजगी २१.५१ हे.आर क्षेत्रामध्ये लघु ,मध्यम व इतर उद्योजकांसाठी लागणारी जमीन मागणी बाबतचा प्रस्ताव शासनाकडे जास्तीत जास्त उद्योजकांनी पाठवावेत आपण उद्योगासाठी मागणी केल्यानंतरच पंढरपूर तालुक्यातील अनेक दिवसापासून चे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. यासाठी उद्योजकांनी प्रस्ताव पाठवावे असे आवाहन पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. आ आवताडे यांच्या माध्यमातून साकार होत असलेल्या एमआयडीसी मुळे प्रगतशील व बागायत शेती क्षेत्र असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील द्राक्षे, डाळिंब व इतर फळे, पीके उत्पादन मालास आयात-निर्यात तसेच प्रकिया माध्यमातून मोठी व्यावसायिक व उद्योग बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकार कालखंडात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाल्याने पंढरीत येणाऱ्या वारकरी भाविकांची मोठी गर्दी जमा होत असल्याने येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद साहित्य, खेळणी व इतर वस्तू निर्मितीसाठी मोठा वाव मिळणार आहे. पांडुरंग भूमीत उद्योग व्यवसाय केल्याने मोठी आर्थिक संपन्नता प्राप्त होते अशी आख्यायिका असल्याने मतदारसंघातील उद्योजकीय चाके गतिमान होऊन अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकांनी याबाबतची जाहिरात नुकतीच प्रसिद्धीला दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी औद्योगिक विकास महामंडळाकडून अधिनियम १९६१ मधील भूसंपादन तरतुदीद्वारे औद्योगिक क्षेत्रासाठी खाजगी क्षेत्र २१.५१ हे. आर मध्ये इच्छुक उद्योजकांनी आपल्या उद्योगासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी शासनाच्या नियमानुसार दिलेल्या प्रस्तावा द्वारे आवश्यक कागदपत्रासह करावी. यासाठी इच्छुक उद्योजकांना १८० दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जास्तीत जास्त उद्योजकांनी उद्योजक क्षेत्रासाठी ची मागणी करावी अशी जाहिरातही प्रसिद्ध झाले आहे. तरी इच्छुक उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेऊन पंढरपूर तालुक्याचे अनेक दिवसांपासूनचे अपूर्ण स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संधीचा उपयोग केला तर पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी सर्व अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

आतापर्यंत केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एमआयडीसीचे नुसते गाजर दाखवण्यात आले होते. परंतु आमदार झाल्यापासून आमदार समाधान आवताडे यांना पहिल्या टर्ममध्ये साडेतीन ते चार वर्षापर्यंत चा कालावधी मिळाला या कालावधीमध्ये वारंवार मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांच्याकडे वारंवार पाठवपुरावा करून अशक्य वाटत असलेली एम आय डी सी उभा राहण्याच्या दृष्टीने पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसत आहे.

कागदावर असणारी एमआयडीसी प्रत्यक्षात कधी साकार होणार? असा सवाल उपस्थित करुन विरोधकांनी भरपूर टीका केल्या पण अखंड प्रयत्न शांत, संयमी आणि अभ्यासू दृष्टीकोनाच्या स्वभावाने केवळ प्रसिद्धीसाठी न करता मतदार संघातील तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे व बाहेरील छोटे -मोठे उद्योग पंढरपूर येथे आले पाहिजे यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी अगदी मनापासून प्रयत्न केले व यश संपादन झाले

-विजयसिंह देशमुख

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व 

माजी उपसभापती 

पंचायत समिती पंढरपूर.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !