पक्षवाढीसाठी तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विधानसभा संघटक, अध्यक्ष, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा समन्वयक, यांची बैठक
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
शिवसेनेचे तालुका प्रमुख शहर प्रमुख यांनी शिवसेना पक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे कार्य व त्यांचे विचार प्रत्येक गावात घरा घरात पोहचवावेत यासाठी शिवसेनेची गावात प्रत्येक शाखा असणे गरजेचे असून गण गट निहाय पदाधिकारी असणे गरजेचे आहे त्याबाबत जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांनी दोन दिवसा पूर्वी जिल्हातील तालुका प्रमुख, शहर प्रमुख विधानसभा संघटक, अध्यक्ष, उपजिल्हा प्रमुख जिल्हा समन्वयक यांची तातडीची बैठक घेतली व पक्ष वाढी साठी काही सूचना केल्या त्याचप्रमाणे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आपल्याकडे सर्व आरक्षित जागेच्या प्रमाणे उमेदवार तयार पाहिजेत जिल्हातील शहरा मध्ये देखील नगर पालिका, नगर पंचायत मधील वार्ड, प्रभागात देखील शिवसेनेचे महत्व जनतेला पटवून देनारा शिवसैनिक तयार असला पाहिजे.
उपमुख्यमंत्री यांनी जे उपक्रम समाज हिताचे राभवले ते उपक्रम सर्व सामान्य लोकांना समजले पाहिजेत लाडकी बहीण योजना साहेबांनी राभवली व ती मी शेवट पर्यत टिकवणार असा विश्वास सर्व शिवसैनिकांनी साहेबाच्या वतीने सर्व बहिणींना घरो घरी जाऊन दिला पाहिजे व भविष्यात साहेबाचे अजून हात बळकट करायचे असतील तर धनुष्यबाण लक्षात ठेवला पाहिजे तसेच सर्व शिवसैनिकानी येणाऱ्या निवडणुका डोळ्या समोर ठेऊन तातडीने जिल्हातील सर्व गण, गट व वार्ड, प्रभागात निहाय ग्राऊंड लेव्हल ला काम चालू करा त्याचा फायदा धनुष्य बाणास व मित्र पक्षाच्या उमेदवारस झाला पाहिजे.
त्याकरिता येत्या आठ दिवसात जिल्हातील सर्व तालुका निहाय दौरा अयोजित करणार आहे या वेळी तालुक्यातील सर्व शाखेना भेटी, बैठका,व शिवसैनिकांना लागणारी ताकत पुरवली जाईल या वेळी एका दिवशी दोन तालुके पूर्ण करणार आहेत सातारा जिल्हात पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब व संपर्क प्रमुख शरदजी कणसे साहेब यांच्या सूचनेप्रमाणेच या जिल्हात जिल्हा प्रमुख या नात्याने शिवसेनेचे भगवे वादळ तयार करू
ही बैठक जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले याच्या नेतृत्वाखाली झाली या वेळी जिल्हा समन्वयक प्रदीप माने, संदीप पवार उपजिल्हा प्रमुख,संजय देशमुख , शिवसेना वाई विधानसभा प्रमुख विकास शिंदे,शहर प्रमुख निलेश मोरे इ. सर्व तालुक्यातील तालुका प्रमुख व सर्व शहरातील शहर प्रमुख उपस्थित होते या सर्वांच्यातुन एख मुखी निघणाऱ्या दौऱ्याचे कौतुक करण्यात व जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्व खाली निघणाऱ्या दौऱ्याचे समर्थन ही केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा