संस्थापक अध्यक्ष विकास विठ्ठल बेंगडे पाटील यांची घोषणा
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
महागणपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आपल्या प्रगतीच्या प्रवासात एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास विठ्ठल बेंगडे पाटील यांनी दि २१ रोजी सोसायटीने १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केल्याची अधिकृत घोषणा केली.
ही भरारी केवळ आर्थिक यश नाही, तर नाविन्यपूर्ण योजनांचा, विश्वासाचा आणि सामूहिक प्रयत्नांचा दैदिप्यमान परिणाम आहे. आधार मासिक व्याज योजना, गृहलक्ष्मी सन्मान योजना, सुकन्या मंगल योजना, चिरंजीव कल्याण योजना, धनलक्ष्मी आवर्ते योजना, लखपती योजना, विविध ‘दाम’ गुंतवणूक योजना व मुदत ठेव योजना यासारख्या प्रभावी नाविन्यपूर्ण योजनेद्वारे महागणपतीने सामान्य माणसाच्या स्वप्नांना हातभार लावला आहे.
केवळ योजना नव्हे, तर संस्थेने भावनिक नाते जपणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे सभासदांना कायम आपलंसं ठेवलं आहे. खास ठेविदारांसाठी आंबा महोत्सव, दिवाळी फराळ वाटप, पैठणी साडी भेट, वाढदिवस साजरे करणं, अष्टविनायक व ज्योतिर्लिंग यात्रा हे उपक्रम सोसायटीची वेगळी ओळख निर्माण करतात.
महागणपती परिवारात आज १३ हजार ६०० पेक्षा अधिक सभासद , १८ कार्यरत शाखा आहेत. या शाखा पुणे व सातारा जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या असून, मोशी, भोसरी, चिखली, शिवणे, जुन्नर, ओतूर, निघोज यांसह १८ ठिकाणी सेवा दिली जात आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल विकास विठ्ठल बेंगडे पाटील यांनी सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक व महागणपती परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले व पुढील काही नजिकच्या महिन्यांत २५० कोटींच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं. महागणपती मल्टीस्टेट चे " तुमच्या विश्वासाची आणि भविष्यातील सुरक्षिततेची खात्री ! " या तत्वाने वाटचाल सुरू आहे .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा