सात हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तहसील कार्यालयचे खापरखुटीचे तलाठी आणि तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक ॲन्टीकरप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. शेत जमिनीचे प्रकरणात सात हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडून त्यांना गजाजाड केले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे यातील तलाठी यांच्या सेवानिवृत्तीला अवघे दोन महिने सात दिवस बाकी असताना अति पैशाच्या हव्यासापोटी गजाआड व्हावे लागले
यातील हकीकत अशाप्रकारे आहे की, मौजे तांदुळवाडी शिवार ता. सिंदखेडराजा येथील गट नं. २४ मधील तक्रारदार व त्यांचे भावाचे नावावरील जमीन महाराष्ट्र जमीन महसुल संहीता १९६६ कलम ८५ (२) प्रमाणे जमिनीचे आपसात वाटणी करून तकारदार यांच्या आईचे नाव ७/१२ उता-यावर लावणेबाबत तहसिलदार सिंदखेडराजा यांचेकडुन आदेश करून देण्यासाठी आलोसे तलाठी रावसाहेब काकडे खामगाव सज्जा यांनी ७००० रू. देवून टाकणे बाबत प्रोत्साहन दिले व आलोसे महसुल सहायक श मनोज झिने यांनी ७००० रू. लाचेची मागणी करून ७०००/- रू. लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. वरून त्यांचेविरूध्द पोलीस स्टेशन सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथे कलम ७, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवा
पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती मारुती जगताप अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती सचिन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी , पोलीस उपअधिक्षक भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक, , अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा रमेश पवार, व सोबत सापळा पथक एएसआय, शाम भांगे, पोहेकॉ. प्रविण वैरागी, राजेंद्र क्षिरसागर, पोना जगदिश पवार, विनोद लोखंडे, पोकॉ. शैलेश सोनवणे, रंजीत व्यवहारे, चापोना नितीन शेटे, चापोकों/शेख अरशद, अॅन्टी करप्शन ब्यूरो, बुलढाणा यांनी पार पाडली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा