गहाळ सोने परत करून पोलीसांनी केली सोन्यासारखी कामगिरी

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

Police return missing gold, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण) 

शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत करत प्रशंसनीय कामगिरी केली आहे. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पहिल्या घटनेत, ११ मे २०२५ रोजी शिरूर एस.टी. स्थानक परिसरात रूपाली अनिल काळे (रा. त्रिमूर्तीनगर, जळोबी, बारामती) यांचे ६.१ तोळे वजनाचे, अंदाजे ३,९०,००० रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केले होते. आरोपी मनिषा कसबे व शोभा दामोदर (दोघी रा. संजयनगर, श्रीरामपूर, अहिल्यानगर) यांच्याकडून सदर गंठण हस्तगत करण्यात आले.

दुसऱ्या प्रकरणात, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी छबुबाई नारायण बनसोडे (रा. पाचर्णेमळा, शिरूर) यांच्याशी “आजी” म्हणून बोलण्याच्या बहाण्याने दिशाभूल करत आरोपींनी ७८,००० रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र व कानातील फुलांची चोरी केली होती. गुजरात व नागपूर येथील पाच आरोपी – हरी बावरी राठोड, सुरज व राहुल राजपूत, गौरांग पटेल व बबलु सोलंकी – यांना अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

दोन्ही प्रकरणांतील दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक २४ जून २०२५ रोजी फिर्यादी रूपाली काळे व छबुबाई बनसोडे यांना पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते स्वाधीन करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस हवालदार बापू मांगडे यांनी केली. शिरूर पोलिसांच्या तातडीच्या व तंत्रशुद्ध कारवाईमुळे फिर्यादींसह स्थानिक नागरिकांत समाधान  व्यक्त केले जात आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !