सिंदखेड राजा तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षणासाठी ८ जुलैला सोडत

तहसीलदार अजित दिवटे यांनी केले आदेश जारी

Grampanchayat election, sindkhedraja, Buldhana, shivshahi news, politics,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)

सिंदखेड राजा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या २०२५ ते २०३० या कार्यकाळासाठी सरपंच पदाच्या आरक्षण प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, सिंदखेडराजा तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी सोडत काढण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचना क्रमांक ग्रापनि २०२५/प्र.क्र.१३/पंरा-२, दिनांक १६ जून २०२५ तसेच मा. जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे पत्र क्रमांक कावि/अ.का. २ सा.नि./कक्ष-१४/४२७/२०२५, दिनांक १७जून २०२५ नुसार सदर आरक्षण प्रक्रिया करण्यात येणार आहे.

ही प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडावी यासाठी तहसील कार्यालयाने सर्व ग्रामपंचायतींतील कार्यरत सरपंच, सदस्य तसेच सामान्य नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

या अनुषंगाने सिंदखेडराजा तालुक्याचे तहसीलदार अजित दिवटे यांनी आदेश जारी केले असून, त्यानुसार आरक्षण सोडत काढण्याची सभा दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती हॉल, सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सोडतीमध्ये ८० ग्रामपंचायतींच्या सरपंच पर्दावरील आरक्षणाचे अंतिम स्वरूप निश्चित होणार असून, यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय, महिलांसाठी असलेले आरक्षण इत्यादीचा समावेश राहणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व कोणत्या गटासाठी खुले राहणार, हे या सोडतीद्वारे निश्चित होणार आहे. त्यामुळे राजकीय इच्छुकांपासून सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत याकडे विशेष लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायत स्तरावर पुढील पाच वर्षांसाठी स्थानिक नेतृत्वाची रूपरेषा निश्चित करणारी ही सोडत प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, सर्व संबंधितांनी या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !