maharashtra day, workers day, shivshahi news,

मंजूर घरकुल लाभार्थ्यांना कार्यालयामार्फत मोफत वाळू पुरवणार - तहसीलदार सोनाली मेटकरी

पाचवड येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान मोठ्या उत्साहात संपन्न

Free sand for shelter beneficiaries, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

पाचवड तालुका वाई येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 30 रोजी सह्याद्री मल्टीपर्पज हॉल येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नियमित्ताने वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी उपस्थित नागरिकांना या अभियानाचे महत्त्व सेवा योजनेची माहिती दिली त्याचबरोबर पाचवड मंडल अधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या तेरा गावातील मंजूर नवीन घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी लागणारी वाळू ही वाईच्या तहसील कार्यालयाने मार्फत मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या संधीचा फायदा लाभार्थ्यांनी घ्यावा असे आव्हान त्यांनी यावेळी बोलताना केले यावेळी अमृतवाडी सरपंच सचिन रत्नपारखे मंडल अधिकारी धनंजय भोसले ग्राम महसूल अधिकारी सुहास अभंग प्रकाश पवार नितीन माने संकेत साळुंखे आकाश भरगुडे हे उपस्थित होते

त्यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अभियाना अंतर्गत या कार्यक्रमात वाई तालुक्यातील पाचवड या गावीशुक्रवारी पार पडला या अभियानांतर्गत विविध शासकीय सेवांचा लाभ पाचवड अमृतवाडी आसले कडेगाव बावधन व्याजवाडी कुंभारवाडी या गावांमधील महिला पुरुष व शालेय विद्यार्थी अशा शेकडो गरजू नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेतला

पाचवड मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालय व सर्व शासकीय कार्यालय यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात येत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध शासकीय सेवा पुरवणारे विभाग व त्यांचे अधिकारी कर्मचारी नागरिकांना सेवा प्रदान करण्यासाठी संपूर्ण तयारी निशी सज्ज झालेल्या असतात यात प्रामुख्याने महसूल विभाग कृषी विभाग विद्युत पुरवठा विभाग आरोग्य विभाग अन्नपुरवठा विभाग सेतू विभाग संजय गांधी निराधार योजना विभाग मनरेगा विभाग इथेच विभागांचा समावेश आहे या अभियानांतर्गत मुस्लिम उपकारमार्फत चौकशी अहवाल 495 सातबारा आठ उतारे 238 फेरफार 38 वारस नोंदी 21 कुणबी नोंदी 7 नाव वाढविणे 17 नाव कमी करणे 9 दुबार पिवळे कार्ड दोन उत्पन्नाचे दाखले 70 जातीचे दाखले 40 जातीचे दाखले वाटप 22 आधार कार्ड चोवीस मृत्यूचे दाखले आठ पीएम किसान कार्ड नाव अशा दाखल्याचे एकूण 1026 वाटप लाभार्थ्यांना   करण्यात आले

यावेळी नागरिकांना रेशन कार्ड मध्ये नाव वाढविणे नाव कमी करणे उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले कृषी यांत्रिकरीकरण जन्माचे दाखले मृत्यूचे दाखले जॉब कार्ड जलतरा प्रस्ताव विहीर प्रस्ताव नवीन वीज कनेक्शन अर्ज नावात बदल अर्ज उतारे इत्यादी सेवांचा लाभ लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात आला यावेळीयावेळी पासवर्ड ग्रामपंचायत सरपंच सदस्य माजी शेवाळे नितीन विसापुरे अनिकेत बाबर महसूल सेवक शैलेश गायकवाडपाचवड सरपंच ग्रामपंचायत सदस्य अजित शेवाळे नितीन विसापुरे पाचवड पोलीस पाटील मोरे मॅडम व पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !