शेळके परिवारातील फुट वेदनादायी - अध्यक्षा सुमनताई गुलाबराव शेळके
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
जी एस महानगर बँकेच्या उभारणी पासून ते आतापर्यंत च्या वाटचालीत बँकेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत सॉलिसिटर गुलाबराव शेळके व ॲड . उदयराव शेळके यांचे मोठे योगदान असून ते कधी ही व कोणी ही नाकारू शकत नाही , या सर्व घडामोडींची मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून बँकेच्या निवडणूकी वरून शेळके कुटुंबात पडलेली फुट माझ्या दृष्टीने माझ्या ह्यातीतील सर्वांत मोठी वेदनादायी बाब आहे , असे स्पष्ट प्रतिपादन व वेदना बँकेच्या विद्यमान अध्यक्षा सुमनताई गुलाबराव शेळके यांनी व्यक्त केल्या.
अध्यक्षा सुमनताई शेळके पुढे म्हणाल्या की , जी एस महानगर बँकेची स्थापना सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने केली , गेल्या ५० वर्षांमध्ये बँकेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे . बँकेच्या प्रगतीच्या प्रवासात माझे पती सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब आणि माझा मुलगा ॲड उदयराव शेळके यांची आहुती गेली , तरीही मी माझे सर्व दुःख बाजूला सारून समाजासाठी बँकेचे सभासद , ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी ठामपणे उभे राहून बँकेची प्रगती साधली . आज आपली बँक भक्कमपणे पाय रोवून उभी आहे . तसेच गेले २ वर्षे मी आपल्या जीएस महानगर बँकेला सुदृढ बँकेचा दर्जा प्राप्त करून दिला आहे , हे सर्व केवळ दिवंगत गुलाबराव शेळके साहेब यांच्या प्रामाणिक विचारामुळे शक्य झाले आहे.
आज मी पुन्हा अजून एक अशा आव्हानाला सामोरे जात आहे . महानगर बँकेच्या सध्याच्या निवडणुकीत अत्यंत खालच्या स्तरावर घडामोडी घडल्या आहेत . घरातीलच काही सदस्यांनी बंड केल्यामुळे आणि काही संचालकांनी मला वचन दिले , तरीही त्यांनी माझ्याशी धोका केला , तसेच काही अतृप्त शक्तींनी या सर्व घडामोडींना खतपाणी घातल्यामुळे मागील ५० वर्षांमध्ये कधीही न पाहिलेले वाईट चित्र या निवडणुकीत दिसत आहे . ही निवडणूक खोटेपणाने माझ्या मुलीवर झालेल्या वैयक्तिक हल्ल्यांनी संचालक मंडळातील फुटींमुळे शेळके परिवार कुटुंबाची सार्वजनिक फाटा फुट आणि प्रतिष्ठेचे संपूर्ण नुकसान झालेले आहे . ही फक्त निवडणूक नाही , तर आमच्या कुटुंबाची वेदनादायी फुट आहे . जी सार्वजनिक पणे उघड होत आहे .
मी आजपर्यंत बँकेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली नव्हती , कारण माझी सदैव इच्छा होती की , ही निवडणूक बिनविरोधपणे पार पाडावी , शेळके विरुद्ध शेळके असा संघर्ष होऊ नये आणि बँकेची प्रतिष्ठा आबाधित राहावी , दुर्दैवाने सर्व प्रयत्न करूनही निवडणूक मात्र आमच्या नियंत्रणाबाहेर गेली , त्या परिस्थितीमुळे आम्हाला सामूहिक निर्णय घेण्यासाठी पुढील वेळ किंवा संधी मिळू शकली नाही . आमच्या काही उमेदवारांनी अगदी शेवटच्या क्षणी पाठ फिरवणे . हे माझ्या दृष्टीने पुर्ण पणे अनपेक्षित होते . त्यामुळे आम्हाला योग्य वेळी औपचारिक प्रतिसाद देणे शक्य झाले नाही .आमच्या पॅनलचे उमेदवारां वर आता ही दबाव आणून फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे ,अशी गोष्ट मी कधीच अपेक्षित धरली नव्हती . या गोष्टी ने मला खूप खोल वेदना झाल्या आहेत . परिणामी निवडणूक प्रक्रिया पुढे सरकले आहे , आमच्या पॅनलला निवडणूक चिन्ह रिक्षा मिळाले आहे . भावनिक दृष्ट्या मी हेही मान्य करते की, या निवडणूक लढाईत मला पूर्वीसारखा उत्साह टिकवणे , आता माझ्यासाठी कठीण झाले आहे आणि सध्याच्या परिस्थितीत सुरू असलेल्या अपप्रचारांनी मला अतिशय त्रास झाला आहे , तरीदेखील प्रक्रिया सुरू झाली आहे . मी आपल्या बँकेच्या सभासदांच्या विचार संपत्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला विनम्र आवाहन करते की , आपण लोकशाही प्रक्रियेचे पालन करून आपला मताधिकार बजावा आणि माझ्या नेतृत्वाखालील संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके पॅनलला मतदान करावे.
सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या वारसाचा मान राखणाऱ्या या संस्थेचे भवितव्य जपण्यासाठी माझ्या पॅनलच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे , जी एस महानगर बँक परिवाराचे सर्व सभासद , खातेदार , ठेवीदार , कर्मचारी आणि हितचिंतक यांचे प्रेम व पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने मी त्यांचे मनःपूर्वक आभारी आहे , असे ही अध्यक्षा सुमनताई गुलाबराव शेळके यांनी सांगितले .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा