क्रीडा सुविधा निर्मिती अंतर्गत आर्थिक सहाय्य योजनेतून ४५ लाख रुपये अनुदान प्राप्त
![]() |
वाई स्विमिंग पूलचे भूमिपूजन करताना विशाल शिवतारे, रणसिंग डेरे, नितीन तारळकर, विश्वनाथ पवार ,विठ्ठल माने शेजारी बाळकृष्ण पवार,दिलीप चव्हाण,दत्ता मर्ढेकर आदी. |
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात स्विमिंग पूलचे भूमिपूजन करण्यात आले. क्रीडा सुविधा निर्मिती अंतर्गत आर्थिक सहाय्य योजनेतून यासाठी क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून ४५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी रणसिंग डेरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, उपकार्यकारी अभियंता गणेश कोदे संस्थापक विश्वनाथ पवार,शिक्षक बॅकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी श तारळकर म्हणाले, शालेय विद्यार्थी शासनाच्या विविध जलतरण स्पर्धा यांच्यासाठी हा तलाव उपयुक्त ठरणार आहे याशिवाय नागरिकांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. क्रीडांगण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी रणसिंग डेरे यांनी यावेळी दिली.
ज्ञानदीपचे संस्थापक विश्वनाथ पवार, विद्यावर्धिनी संस्थेचे सचिव बाळकृष्ण पवार, विश्वस्त दिलीप चव्हाण,दत्ता मर्ढेकर, प्रा दत्तात्रय वाघचवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्या शुभांगी पवार यांनी स्वागत केले.
१३ बाय २५ मीटर मापाचा सेमी ऑलिंपिक दर्जाचा स्विमिंग पूल उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा शिक्षक सचिन लेंभे यांनी यावेळी सांगितले. यावेळी कन्सल्टंट हेमंत शिंदे, किरण पवार, सचिन भिसे, दत्तात्रय महांगडे आदी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा