मित्र मैत्रिणींनी दिला शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
प्रभु विद्याधाम प्रशाला वाडेगव्हाण येथिल इ.१० वीच्या बॅचचा स्नेहमेळावा दि.१८ मे २०२५ रोजी उत्साहात व आनंदाच्या वातावरणात वाडेगव्हाण येथिल ग्लोरी रिसाॅर्ट येथे पार पडला. तब्बल अठरा वर्षांनतर एकत्र आलेल्या मित्र मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि स्नेहबंध दृढ केले.
आपापल्या दिनक्रमातुन जुन्या मित्र मैत्रिणींसाठी एक दिवस वेळ काढुन अनेक माजी विद्यार्थी यावेळेस उपस्थित होते. सुरुवातीला सर्वांचे स्वागत दत्ता बढे यांनी केले. ॲड.गणेश सटाले, राहुल तानवडे,संतोष यादव, जयदिप जांभळकर, अमित घनवट, प्रविण कदम, साईनाथ यादव, संदीप जाधव, अजित यादव, स्वाती झांबरे, योगिता दुर्गे, कांचन रासकर, अमृता रासकर, वैशाली आदक, अजिंक्य झांबरे, कल्पना तरडे, संगीता वाखारे, शीतल कोकणे, आरती खणसे,विकी यादव,सचिन यादव, नवनाथ मोटे, अविनाश शेळके, अमोल कदम, सचिन आडोळे, मनोज वाघमारे, अनिल चव्हाण, राजेंद्र मुरवदे, गोरख पाचंगे आदींनी आपापल्या शालेय जीवनातील आठवणी सांगुन आपापले मनोगत व्यक्त केले तसेच इतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापली सध्याची ओळख सर्वांना करुन दिली.
मैत्रीमधील गोड आठवणींसोबत इतिहासाचा अभिमान सदैव ज्वलंत ठेवण्यासाठी आयोजकांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र भेट म्हणून देण्यात आले. तसेच आठ दिवंगत मित्रांना यावेळी सामुहिक श्रद्धांजली देखिल अर्पण करण्यात आली.
यापुढे आपल्या बॅचच्या वतिने प्रभु विद्याधाम प्रशालेसाठी व तिथल्या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक काम करण्याचा निर्धार यावेळेस सर्व माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.
जुन्या मित्रांना भेटल्यावर एक नवीन ऊर्जा निर्माण होते. वेगळं समाधान भेटतं व सर्वांच्या सुखदुःखाची माहिती होते. त्यामुळे असा स्नेह मेळावा दरवर्षी होणे गरजेचे व आवश्यक आहे असे प्रतिपादन ॲड.गणेश सटाले यांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले. हा स्नेहमेळावा पार पाडण्यासाठी सुनिल भोसले, संतोष यादव, राहुल तानवडे, राहुल शेळके, विक्रम यादव, नरेंद्र चेमटे, संदीप चौधरी, स्वाती झांबरे, रुपाली गाडीलकर, योगेश शिंदे, सुजीत गवळी आदींनी परिश्रम घेतले. संपुर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ह.भ.प.बापु यादव यांनी केले तर आभार उद्योजक सुनिल भोसले यांनी मानले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा