maharashtra day, workers day, shivshahi news,

रागावल्याच्या कारणावरून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन दिल्या पालकांच्या ताब्यात

शिरूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी

Search for underage girls, police, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर शहरामधून दि.१६/०५/२०२५ रोजी दि. १७/०५/२०२५ रोजी दोन अल्पवयीन मुली त्यांचे राहते घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेल्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ३३४/२०२५८ ३३९/२०२५ भारतीय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हे दाखल करून सदरच्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून मुलीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले.

 

दोन्ही अल्पवयीन मुलीकडे कुठलाही मोबाईल नसल्याने व त्यांना कोणी नेले असावे व कशामुळे नेले असावे याबाबत पालकांना देखील माहिती नसल्यामुळे सदरचे गुन्हे उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. परंतु प्रभारी अधिकारी  संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पो. स्टे प्रकटीकरण पथकाचे तांत्रिक माहिला व गुप्त बातमीदार यांच्या आधारे सदरच्या दोन्ही मुलींचा शोध घेऊन दोन्ही मुली दिनांक १८/०५/२०२५ रोजी त्यांचे पालकांचे ताब्यात दिल्या आहेत. तसेच निघून गेलेल्या दोन्ही मुलींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे पालकांशी झालेल्या भांडणाने किरकोळ कारणावरून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याबाबत तपासात सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी  संदीप गिल सो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, श्री रमेश चोपडे सो. अपर पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, श्री प्रशांत ढोले उपविभागीय अधिकारी शिरूर विभाग,  संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी शिरूर पोलीस स्टेशन, शिरूर पो. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार दीपक राऊत, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, सचिन भोई, नीरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील, रवींद्र आव्हाड, अशोक चितारे, महिला पोलीस अंमलदार गोदावरी चंदरे, महिला पोलीस अंमलदार कल्याणी कोडवते यांचे पथकाने केली आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !