maharashtra day, workers day, shivshahi news,

तुषार दोषी साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक

समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदी बदली

Satara Tushar Doshi, Superintendent of Police, sameer shaikh, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

राज्य सरकारकडून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यां करण्यात आले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख पदी तुषार दोषी यांची लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक येथून सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

कोण आहेत तुषार दोशी?

तुषार दोशी हे २००१ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले. मी पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली आणि पोलीस खात्यात भरती झालो, असं तुषार दोषींनी नवी मुंबईत पोलीस उपायुक्तपदी असताना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

राज्य सरकारने २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज काढले असून, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.तर त्यांच्या जागी तुषार दोषी यांना सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पदी बदली देण्यात आले आहे . तात्काळ बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने बजावण्यात आले आहेत.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !