२१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल केला जप्त
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा बाजुंकडून रात्री ३ वाजण्याच्या सुमारास एक तांबड्या रंगाच्या टेंपो मध्ये अमानुष पणे गाई आणी म्हैशी भरून भरघाव वेगात मुंबई कडे कत्तलखान्या साठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे यांना मिळाली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने रात्र गस्तीवर असणारे हवलदार शिवाजी तोरडमल यांना आनेवाडी टोल नाक्यावर या टेंपोला आडवुन त्याची कसुन तपासणी करून त्यात कत्तली साठी नेहण्यात येत असलेली जनावरे आढळून आल्यास तो टेंपो चालकासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाचे पालन करत हवलदार शिवाजी तोरडमल हे आपले सहकारी सहाय्यक फौजदार कांबळे . दत्तात्रेय शिंदे अमीत पवार. होमगार्ड दुरगुडे.बोरकर यांना सोबत घेऊन गाई म्हशी घेऊन जाणाऱ्या टेंपोला आनेवाडी टोल नाक्यावर लेन क्रमांक ६ वर आडवुन त्याची कसुन तपासणी केली असता त्या मध्ये प्रत्येकी ५ हजार रूपये किंमत असणारी पाच रेडके तर प्रत्येकी १० हजार रुपये किंमत असणाऱ्या १५ म्हैशी आणी २० लाख रुपये किंमत असणारा आयशर टेंपो असा एकूण २१ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
टेंपो चालक करीन कुरेशी वय ,२० राहणार गोवंडी मुंबई आणी सोबत असणारा इशारा कुरेशी वय ६५ राहणार कुर्ला मुंबई या दोघांना ताब्यात घेताच त्यांनी हि जनावरे मुंबई येथील कत्तलखान्यात नेहणार असल्याची कबुली दिली. त्यामुळे या दोन्ही आरोपींनवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत वाई तालुक्यातील सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचा सिंहाचा वाटा असल्याची माहिती हवलदार शिवाजी तोरडमल यांनी दिली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा