दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव
हा पुरस्कार माझ्यासाठी आनंददायी तर आहेच, परंतु असे पुरस्कार मिळाल्यानंतर कामासाठी प्रेरणा मिळून कर्तव्याप्रती आणखी जबाबदारी वाढते. यापुढेही समाजसेवेचे माझे व्रत अखंडितपणे चालू राहील" अश्या भावना पुरस्कार मिळाल्यानंतर नितीन कुलकर्णी यांनी शिवशाही न्यूजला बोलताना व्यक्त केल्या आहेत.
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी फैजल पठाण)
पद्मश्री मनीभाई देसाई ट्रस्ट लोणी काळभोर यांच्यावतीने दिले जाणारे राज्यस्तरीय 'राष्ट्रसेवा ' पुरस्कार सोहळा डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे पार पडला . गेली 35 वर्षे हे पुरस्कार विविध क्षेत्रात सेवा कार्य करणाऱ्या सेवाव्रती व्यक्तीना दिले जातात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदूरत्न डॉक्टर रवींद्र भोळे हे होते. तर मंचावर आमदार राहुल कुल , पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण) , आमदार राहुल जावळे (रावेर मतदारसंघ) यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.
रोपळे बु ॥ ता.पंढरपूर गावचे सुपुत्र नृसिंह (नितीन ) रत्नमाला पुरुषोत्तम कुलकर्णी यांना यावर्षीचा दिव्यांग क्षेत्रात करीत असलेल्या कार्याबद्दल राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . ते पुणे जिल्हा परिषदेच येथे दिव्यांग विभागामध्ये नियम वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.
पुणे जिल्हा हे कार्यक्षेत्र असले तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते दिव्यांग क्षेत्रात मार्गदर्शनपर कार्य करीत असतात. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी दिव्यांग क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण केले असून कुलकर्णी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. पुरस्कार स्वीकारताना नितीन कुलकर्णी यांचे वडील श्री.रामदास स्वामी समाधी मंदिर, सज्जनगड सेवाधारी समर्थभक्त पु.व. कुलकर्णी गुरुजी हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते.
मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करताना राष्ट्रसेवा व राष्ट्रवाद हा सर्वतोपरी असून यासाठी सामाजिक कार्यात झोकून देऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचा उचित सन्मान होणे गरजेचे आहे व ते कार्य पद्मश्री मनीबाई देसाई ट्रस्ट करीत आहे असे उद्गार काढून सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये हिंदुररत्न डॉक्टर रवींद्र भोळे यांनी पद्मश्री मनीभाई देसाई यांच्या कार्याचा उहापोह करून उपस्थित त्यांना त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा