शेतकऱ्यांचे विविध योजनांतील अनुदान अद्याप मिळाले नाही
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी कर्ज काढून अनुदानित गायगोठे, विहिरी पूर्ण केल्या. परंतु त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम अद्याप जमा झाली नसल्याने संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष योगेश पाथरीकर यांच्या नेतृत्वाखालील मंगळवारी दिनांक 29 एप्रिल रोजी भीक मागून आंदोलन करण्यात आले. थाळ्या वाजवत प्रशासना विरोधात घोषणाबादी करण्यात आले गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात अनुदानाचा प्रश्न मार्गी न लागल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
सहा महिन्यात अनुदानाची रक्कम न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे तालुक्यात विहिरी खोदकाम व बांधकाम 1340, गाय गोठे बांधकाम 650, आणि मोहगणी वृक्ष लागवड 278 अशी एकूण शेतकऱ्यांची 22 कोटी च्या आसपास एवढी रक्कम थकलेली आहे . शेतकऱ्यांना निवडणुका आचारसंहिता संपल्यानंतर अनुदानाचे पैसे मिळतील असे असेल परंतु ती फोल ठरली सरकार शेतकऱ्यांची केवळ थट्टा करत असल्याचा आरोप यावेळी.गटविकास अधिकारी उषा मोरे यांना संभाजी ब्रिगेडर च्या वतीने निवेदनात देण्यात आले.
आनंदा दगडू बनसोड, हरिकिसन बनसोड, कचरू बनसोड, ज्ञानेश्वर खंबाट, रुपेश सोनवणे, रवींद्र ढेपले, शेख शाकीर, रुपेश सोनवणे, गणेश मोटे, शुभम जगताप, नाना जाधव, मयूर राऊत, सोमनाथ गवारे, उमेश चव्हाण, राजेंद्र बनसोड, सुनील बनसोड,यांनी सहभाग घेतला होता.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा