शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांचे वनविभागाकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पाचवड ते बामणोली रस्त्याचे काम मंजूर झाले असून ते काम घेतलेल्या ठेकेदाराने वनखात्याची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे शेकडो झाडांची कत्तल केली असून याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी केले असून याबाबत सातारा जिल्हा वनविभाग कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात कधी नव्हे उष्णतेचे प्रमाण वाढले असून अशा परिस्थितीत हजारो वृक्ष लागवड करणे सध्या गरजेचे असताना अनेक ठिकाणी रस्ते विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांच्या कत्तली सुरू आहेत हजारो वनप्रेमी नागरिक या धोरणाला विरोध करत असताना ही ठेकेदार सर्रासपणे करीत आहे वृक्षतोडीमुळे होणारे दुष्परिणाम जनतेला जाणून लागले आहेत तरीही ठेकेदार मनमानी कारभार करीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करीत आहेत याबाबत वाई तालुका वाई तालुक्यात सुरू असलेल्या वृक्षतोड थांबते न थांबते तोवर पाचवड ते बामणोलीहा वाई ते जावली अशा तालुक्यातून हा रस्ता जात असून वन खात्याची कोणतीही परवानगी ठेकेदाराने न घेता शेकडो झाडांची कत्तल केल्याचे उघड होताच शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा जिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी ठेकेदाराच्या मनमानी कारभाराच्या तीव्र शब्दात निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.
संदीप पवार यांनी सातारा जिल्हा वन विभाग कार्यालयाला निवेदन दिले असून यामध्ये म्हटले आहे की पाचवड ते बामणोली या मार्गाचे काम महाराष्ट्र शासनाच्या हॅम योजने अंतर्गत सुरू आहे सदर रस्त्याच्या दुतर्फा अनेक वर्ष जुनी दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात परंतु दुर्दैवाने सदर ठेकेदाराकडून कोणतीही बेकायदेशीरपणे वृक्षतोड चालू आहे. ही वृक्षतोड मागील सुमारे 50 दिवसापासून सुरू आहे असे म्हटले आहे सदर वृक्षतोडीमुळे जैवविविधतेचा ऱ्हास होत असून दुर्मिळ औषधी वनस्पतींचा नाश झाला आहे त्याचा कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो
पर्यावरणीय समतोल बिघडत आहे या झाडांच्या कत्तली मुळे कार्बन शोषण मातीची धूप थांबवणे वन्यजीवनाचे आदिवासी यावर भविष्यात प्रतिकूल परिणाम होणार आहेत तसेच ठेकेदार शासकीय काम आहे याचा दुरुपयोग करून वन्यजीव संरक्षण कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत आहेत अनेक झाडांवर पक्षांची व इतर लहान वन्यजीव ची घरटीअसून ती उध्वस्त झाली आहे तभारतीय वन अधिनियम सन 1927 अंतर्गत कोणत्याही झाडाची तोड करण्यापूर्वी वनविभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियम सण 1986 नुसार नैसर्गिक पर्यावरणाची हानी करणे हा दंडनीय गुन्हा आहे जैवविविधता अधिनियम सन 2002 नुसार दुर्मिळ प्रजातीचे संरक्षण करणे आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळे सदर बेकायदेशीर वृक्षतोडीचा तात्काळ पंचनामा करावा संबंधित ठेकेदारावर भारतीय वन अधिनियम व इतर पर्यावरणीय कायद्याखाली गुन्हा दाखल करावा या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी करून ती कारवाई करावी उर्वरितवृक्षसंपदेचे संरक्षण करण्यासाठी काम त्वरित थांबवावे निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कारवाई कायदेशीर करावी अशी मागणी संदीप पवार यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा