संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, राहुरी (प्रतिनिधी गोविंद आढाव)
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय जुनियर कॉलेजमधील इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या सिराज राजमोहम्मद शेख विद्यार्थ्याने स्वप्रयत्नाने कृत्रिम पद्धतीने अंडी उबवून पिल्ले तयार करणारी हॅचरी हे यंत्र बनवले त्याच्या या वैज्ञानिक कृतिशीलतेचा सन्मान समारंभ विद्यालयात पार पडला.
यावेळी डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची मा. व्हाईस चेअरमन व तसेच या साहेब पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय श्यामकाका निमसे, दैवत उद्योग समूहाचे संस्थापक केशव शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी भाऊ मोरे, पंचायत समितीचे मा. सभापती ज्ञानदेव निमसे, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य प्रताप निमसे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, युवा उद्योजक विनोद करपे, भागवत नवाळे, आदी ग्रामस्थ विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शिंदे उप प्राचार्य भारत वारुळे व विद्यालयातील शिक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा त्याच्या आई-वडिलांसोबत सत्कार करण्यात आला याप्रसंगी मान्यवरांनी त्याचे कौतुक करून त्याच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यालयातील जो विद्यार्थी अशा प्रकारचे वैज्ञानिक उपकरण बनवेल अश्या प्रथम तीन उपकरणासाठी रोक 11000 रुपयांची बक्षीस जाहीर केले तसेच मियासाहेब पतसंस्थेच्या वतीने विद्यालय सीसीटीव्ही संच व बोर्ड परीक्षेदरम्यान बिसलरी बॉटल विदयार्थासाठी उपलब्धता करून देण्यात आले, दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष केशवराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम पिण्याच्या पाण्याची सुविधा होण्यासाठी विद्यालयास 1000 लिटर क्षमतेचे आरो फिल्टर मशीन देण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे श्री विनोद करपे यांनी स्वच्छतागृह व शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विद्यालयास हाय प्रेशर एचडीपी पंप पंप देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मोढे व आभार प्रा.सुभाष शिंदे यांनी मानले
त्याचप्रमाणे शाळेचे विकासासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालय चे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावचे सरपंच लीलाताई गायकवाड दैवत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी भाऊ मोरे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव गुलाब निमसे या सर्व ग्रामस्थांसह पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी या इंटरनॅशनल स्कूल ला भेट देऊन विद्यालयामध्ये विविध बदल करण्याचे हेतूने अभ्यासावलीच्या आयोजन करण्यात आले होते
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा