करमाळा पोलीसांची चमकदार कामगिरी
शिवशाही वृत्तसेवा, करमाळा
दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी गोपणीय रित्या मिळालेले' बातमी प्रमाणे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी कारवाई केली. करमाळा पोलीस ठाणेकडील डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार वैभव राजेंद्र ठेंगल यांना गोपनीय खबर मिळाली की, मौजे कुंभेज फाटा पोपळज रोड येथे एक इसम गांजा विक्री करीता घेवून येणार आहे; अशी खबर मिळाले बरोबर त्यांनी मा. पोलीस निरीक्षक साहेब श्री रणजीत माने यांना सदरची खबर सांगताच पो. नि. श्री रणजीत माने यांनी सदर बाबत सापळापुर्व तयारी करुन, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री नारायण शिरगावकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग अकलुज अति. चार्ज करमाळा उपविभाग करमाळा यांना सदर खबरीचे बाबत माहिती देवून त्यांचे प्राधिकारपत्र घेवून त्यांचे सुचना प्रमाणे , सापळा कारवाई करणे करीता पथक तयार केले.
पथक प्रमुख स्वतः श्री रणजीत माने, सहा. पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, पो.स.ई पाखरे तसेच पोलीस अंमलदार पो.ना/११६२ मनीष पवार, पो. शि/१५५० काझी, पो.शि. /१७४८ घोंगडे, पो.शि./११४३ जगताप, पो. शि/८५६ अर्जुन गोसावी इत्यादी यांची टिम तयार करुन, पथकातील सर्वांना मिळालेले बातमी बाबत सांगुन योग्य त्या सुचना देवून, सरकारी वाहन व खाजगी वाहनासह सोबत सरकारी पंच व पंचनामा करणे करीता लागणारे साहीत्यासह करमाळा ते टेंभुर्णी रोडवरील कुंभेज फाटा पोपळज रोडवर सापळा रचून, त्यांना मीळालेले खबरी प्रमाणे एक इसम त्यांचे हातात एक काळया रंगाची रेगझीनची बॅगेसह रोडचे बाजुस दुपारी १६:३० वाजताचे सुमारास उभा असलेले दिसून आला त्याचा खबरी प्रमाणे संशय आल्याने, त्यास पो. नि. रणजीत माने यांनी पथकाचे मदतीने, सापळा रचून शिताफिने पकडून आपली ओळख देवून, त्यांचे पंचा समक्ष नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव गौरव प्रकाश माल्हिकर वय २३ वर्षे. रा. दत्त नगर पुणे मुळगाव गेवराई, जि. बिड. असे असल्याचे सांगीतले.
त्यांची अंग झडती व त्यांचे ताबेतील काळया रंगाचे बॅगची तपासणी करता त्या मध्ये एकुण किंमत २,५८, २५० /- रुपये किंमीचा गांजा निळया रंगाचे प्लास्टीक बॅगमध्ये त्याचे आत, खाकी रंगाचे कागदात पॅक केलेला, हिरव्या रंगाची पाने, फुले, काडया, बिया असलेला अशा वर्णचा एकुण १० किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा. मीळाला तो पंचा समक्ष पो. नि. रणजीत माने यांनी जप्त करुन, इसम नामे गौरव प्रकाश माल्हिकर वय २३ वर्षे. रा. दत्त नगर पुणे मुळगाव गेवराई, जि. बिड त्यास गुन्हाचे कामी ताबेत घेवून त्यांचे विरुद्ध सरकार तर्फे पो.ना. ९१२ वैभव राजेंद्र ठेंगल यांनी फिर्याद दिल्याने एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) ॥ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करुन, सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री पोपट टिळेकर यांना देणत आलेला असुन त्यांनी सदर इसम नामे गौरव प्रकाश माल्हिकर वय २३ वर्षे. रा. दत्त नगर पुणे नमुद गुन्हयांत रितसर अटक गुन्हयाचे, त्यास मे. कोर्ट करमाळा येथे हजर केले असता त्यास २४/०४/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर करणेत आलेली आहे, अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री पोपट टिळेकर हे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, सो, सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, सोलापुर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री अजीत पाटील करमाळा उपविभाग करमाळा, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधीकारी अकलुज उपविभाग अकलुज अति. कार्यभार करमाळा उपविभाग करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहा. पो. नि. पोपट टिळेकर, पो.स.ई पाखरे, ए.एस.आय. शिनगारे, पो.हे.कॉ/१५० लोहार, पोलीस अंमलदार पो.ना./९१२ वैभव ठेंगल, पो. ना/११६२ मनीष पवार, पो.शि/१५५० काझी, पो.शि. /१७४८ घोंगडे, पो.शि./११४३ जगताप, पो.शि/८५६ अर्जुन गोसावी, पो.हे. कॉ/१६४८ अजीत उबाळे, पो.शि. /१५२४ रंदील, पो. शि/२१४२ शिंदे, पो.शि/४३८ घटकुळ, पो. कॉ/१६७ दहीहंडे, पो. कॉ/६८९ येवले व चालंक पोकॉ/१३९६ नितीन चव्हाण यांनी केली आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा