पाकिस्तान विरोधात शिवसैनिकांकडून तुफान घोषणाबाजी
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटक हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवत आक्रोश व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्व जपण्यासाठी सदैव तत्पर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देईल असा इशारा देत काँग्रेस व विरोधकांनी याचे राजकारण करू नये असा सल्ला देत विरोधकांवर जहरी टीका केली.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख आरती बसवंती यांनी हल्ल्याचा निषेध करत केंद्र व राज्य सरकार जशास तसे उत्तर देईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, शिवसेना जिल्हाप्रमुख आरती बसवंती, शहर प्रमुख मुन्ना भोसले, तानाजी मोरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ग्राहक संरक्षण जिल्हाप्रमुख ओंकार बसवंती, उपजिल्हाप्रमुख रूपाली मलपे, माळशिरस तालुका प्रमुख रोहिणी आहिर, माळशिरस संघटक प्रमुख रंजना शिंदे, कुर्डूवाडी शहर प्रमुख सीमा मोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा