maharashtra day, workers day, shivshahi news,

आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश

कोण खेळतंय नागरिकांच्या आरोग्याशी ?

mla dyaneshwar mauli katake, stp plant, nagar parishad, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

शिरूर नगरपरिषदेच्या एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा आमदार माऊली कटके यांच्या अचानक भेटीत खुलासा – प्रशासनावर गंभीर आरोप, नागरिकांच्या आरोग्याशी सरळ सरळ धोका

शिरूर नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार कागदोपत्री सुस्थितीत दाखवला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र तो धोकादायक अवस्थेत आहे, हे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या रविवारी दिलेल्या अचानक भेटीत स्पष्ट झाले. एसटीपी (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट) प्रकल्पाला दिलेल्या या पाहणीद्वारे नगरपरिषदेच्या कारभारातील अकार्यक्षमता, अपारदर्शकता, आर्थिक अपव्यय आणि नागरिकांच्या आरोग्याविषयीची पूर्ण बेपर्वाई समोर आली.

प्रकल्प चालू दाखवण्यासाठी दोन दिवसांत तातडीची साफसफाई – जनतेच्या डोळ्यात धूळफेक

जनता दरबाराच्या निमित्ताने आमदार माऊली कटके हे शिरूर शहरात येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घाईघाईने दोन दिवसांत प्लांट साफसफाई करून तात्पुरता सुरु केला. मात्र आमदार कटके यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट प्लांटला भेट दिल्यानंतर खऱ्या अडचणी आणि अपयश समोर आले.

पाहणीवेळी कोणालाही उत्तर देता आले नाही

कर्मचारी जबाबदारी टाळत ‘रविवार’चे कारण प्लांटवर उपस्थित असलेल्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना आमदार कटके यांनी अनेक थेट प्रश्न विचारले. मात्र कोणालाही समाधानकारक उत्तर देता आले नाही. रविवारी असल्याचे कारण देत त्यांनी जबाबदारी झटकली. यामुळे आमदारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि विचारले, “जर कर्मचारीच जबाबदारी घेणार नाहीत, तर नागरिकांचे हित कोण बघणार?

ही पाहणी केवळ आमदार कटके यांनीच नव्हे, तर अनेक सामाजिक व राजकीय प्रतिनिधींनी ही केली. त्या मध्ये श्री राम सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष सुनील जाधव, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष एजाज बागवान, अतुल गव्हाणे, स्वप्निल रेड्डी, रंजन झांबरे, सोनू धन्नी हर्षद (टिकू)ओस्तवाल, सुरज शिंदे, सुनील जाधव, एजाज बागवान, अनिल बांडे, अतुल गव्हाणे, स्वप्निल रेड्डी, रंजन झांबरे, सोनू धन्नी हर्षद (टिकू) ओस्तवाल, सुरज शिंदे हे उपस्थित होते. या सर्वांनीही प्रकल्पाची दुरवस्था पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली.

कोट्यवधींचा खर्च

पण प्रकल्प केवळ दोन वर्षच चालला, ‘टक्केवारी’मुळे ठप्प या प्रकल्पावर नगरपरिषदेने कोट्यवधी रुपये खर्च केले. प्लांट केवळ दोनच वर्षे पूर्ण क्षमतेने चालवला गेला. त्यानंतर ‘टक्केवारी’च्या मागण्या सुरू झाल्या, ठेकेदाराला त्रास दिला गेला, आर्थिक व्यवहारांतील गोंधळ वाढले. शेवटी वैतागून ठेकेदाराने काम बंद केले व प्रकल्प कायमचा बंद पडला 

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसा – पण कारवाई नाही

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने वेळोवेळी नगरपरिषदेच्या विरोधात नोटिसा बजावल्या. मात्र प्रशासनाने फक्त खोटे अहवाल पाठवून शासनाची दिशाभूल केली. प्रकल्प बंद असल्याने सांडपाणी प्रक्रिया न होता थेट नदीत सोडले जात आहे. हे नागरिकांच्या आरोग्याशी सरळ सरळ धोका असून गंभीर गुन्हा आहे, असे प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले.

नगरपरिषदेचा कारभार म्हणजे केवळ ‘कागदोपत्री’ नियोजन – प्रत्यक्षात मात्र गंभीर फसवणूक

आमदार माऊली कटके यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “जर प्रकल्प बंद, कर्मचारी जबाबदारी टाळत असतील, नोटिसा फक्त फायलीत राहतील, आणि सांडपाणी थेट नदीत – तर हे कारभार नव्हे तर जनतेशी फसवणूक आहे.”

जलशुद्धीकरण प्रकल्पाचाही पर्दाफाश

ही काही पहिलीच घटना नव्हे. याआधीही आमदार कटके यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाला अचानक भेट दिली होती. तेथील दुरवस्था पाहून त्यांनी नवीन डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र अजूनही प्रत्यक्ष कृती झाली नाही. शिरूर नगरपरिषदेचा कारभार म्हणजे ‘देखावा आणि दिशाभूल’ – आमदार कटके यांच्या एकाच भेटीत सर्व स्पष्ट शिरूर नगरपरिषदेचा कारभार म्हणजे देखावा, अपारदर्शकता, निधीचा अपव्यय, आणि नागरिकांच्या आरोग्याशी थट्टा.

आमदार माऊली कटके यांच्या एका अचानक भेटीत हे सगळं उघडकीस आलं.

शहरवासीयांच्या पैशावर उभारलेले प्रकल्प केवळ ‘टक्केवारी’च्या खेळामुळे बंद पडत असतील, तर ही शरमेची बाब आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !