गौतम जाधव यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी प्रशालेचे उपशिक्षक गौतम जाधव यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
यावेळी प्रशालेच्या उपशिक्षिका सौ अलका सातपुते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांबद्दल दलितांबद्दल तसेच भारताच्या राज्यघटनेसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या मोलाच्या कार्याबद्दल सर्वांना माहिती सांगितली.
यावेळी सिद्धार्थ विकास मंडळ तळेगाव ढमढेरे यांनी पुण्यावरून आणलेल्या ज्योतीचे स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेच्या प्रांगणात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या तर्फे स्वागत करण्यात आले तसेच प्रतिनिधिक स्वरूपात तळेगाव ढमढेरे चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट यांचा सत्कार महेश ढमढेरे यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने जल्लोषात कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी सर्व ग्रामस्थ व सिद्धार्थ विकास मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भिमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा समिती चे सदस्य विकास आल्हाट यांच्यातर्फे विजयस्तंभाची प्रतिकृती प्रशालेस भेट देण्यात आली
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे ,पर्यवेक्षक मोहन ओमासे, शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा