डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाचवड येथे मोफत महाआरोग्य शिबिर
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सध्या धावपळीच्या जीवनात मानवी जीवनाचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेकांना कर्करोगाच्या आजाराने ग्रासले जात आहे. कित्येकदा वेळेत तपासण्या व औषधोपचार न केल्यामुळे मृत्यूचा सामना करावा लागत आहे यासाठी शासनाच्या मोफत आरोग्य योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी केले. पंचशील सामाजिक सेवा मंडळ पाचवड व ग्रामपंचायत पाचवड आणि वेदांत सेंटर हॉस्पिटल घाटकोपर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाचवड तालुका वाई येथे मोफत महाआरोग्य शिबिर व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया या शिबिरात ते बोलत होते.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच सदस्य व इतर अरे व इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये इसीजी ब्लड प्रेशर शुगर अस्थमा तपासणी हाडांची तपासणी डोळ्यांची तपासणी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आधार काठी एन्जोप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया मोफत अंजॉग्रफी पित्ताशय शस्त्रक्रिया किडनी स्टोन हाडांची शस्त्रक्रिया तोंडाचा कर्करोग स्तनांचा कर्करोग कानांचे आजार व चष्मे वाटप अशा विविध आजारांचे 350 महिला व पुरुष यांच्या मोफत तपासण्या करून त्यांना औषध उपचार करण्यात आले. हे शिबिर दोन दिवस होते. हे शिबिर पार पाडण्यासाठी पंचशील सामाजिक सेवा मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी मोलाचे कार्य केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा