आमदार काशिनाथ दाते यांनी गावासाठी केला दहा लाख रुपये निधी मंजूर
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पळवे खुर्द स्मशानभूमी सुशोभीकरण विकास कामासाठी पारनेर नगर विधानसभेचे विद्यमान आमदार काशिनाथ दाते यांनी एकूण दहा लाख रुपये मंजूर केल्याबद्दल आमदार साहेबांचा सत्कार पळवे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.तसेच यावेळी आमदार साहेबांनी पळवे खुर्द गावासाठी कुठल्याच प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही असा शब्द दिला.
यावेळी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे दूध संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार,दूध संघाचे माजी संचालक शशिकांतराव देशमुख,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडीलकर, सागर आबा मैड,बाबासाहेब शेळके, तंटामुक्तीचे अध्यक्ष आबासाहेब इरकर,युवराज पाटील,माजी सरपंच नानाभाऊ गाडीलकर,चे. वसंतराव देशमुख,रविंद्र नवले,विजय जगताप, हरिभाऊ भंडलकर,चे.अंबादास तरटे मेजर,उपसरपंच दत्तात्रय गाडीलकर, बाळासाहेब शेळकेसर सर, व्हा. चे. चंद्रकांत पाचारणे, ए डी सी सी बँकेचे नवनाथ पाचारणे ,भारत झनान साहेब,ग्रा.प.सदस्य रमेश पाचारणे,विक्रांत देशमुखु,बाळु जाधव, पोपट बारगळ,गणपत तरटे सोपान पवार मेजर,रामदास पाचारणे, राजाराम शेळके,भानुदास पाचारणे, दिनकर जाधव,मच्छिंद्र नरवडे,संतोष गांगड,पत्रकार सुदाम दरेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा