घर सामान आणि गोठ्यातील जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
मलकापूर तालुक्यातील भाडगनी येथील शेतकरी जगन्नाथ काशीराम शेगोकार यांच्या राहत असलेल्या शेतातील घराला व गोठ्याला आग लागली या आगीत घरातील असलेले सर्व धान्य जाळून खाक झाले त्यामध्ये 10 पोते गहू 5 पोते हरबऱ्याचा व काही प्रमाणात तुरीचा समावेश आहे आग एवढी भीषण होती की शेजारील गोठ्यात बांधलेल्या एका बैलाचा जळून मृत्यू झाला तर एक बैल गंभीर जखमी झाला आहे.
जगन्नाथ शेगोकार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह शेतात राहत होते पत्नी व मोठा मुलगा बाहेरगावी गेले असल्याने त्यावेळी घरी कोणीच नव्हते जगन्नाथ आपल्या लहान मुलासोबत दुसरीकडे असलेल्या शेतात काम करत होते आग लागल्याचे लक्षात येताच शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत घरातील सर्व जळून खाक झाले होते घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला व जखमी जनावरांना उपचारासाठी दाखल केले आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा






