maharashtra day, workers day, shivshahi news,

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांची स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या

कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज 

Neuro Physician Dr. Shirish Walsangkar, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी राज सारवडे)

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेत जीवन संपवलं. प्राथमिक माहितीनुसार दोन राउंड फायर झाल्या. त्यातील एक गोळी डोक्याच्या आरपार गेली.

मोदी परिसरात असलेल्या त्यांच्या घराच्या बेडरूममध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडली.या घटनेमुळं सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरातील नामांकित रुग्णालय वळसंगकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अज्ञात कारणावरुन रात्री 8.30 च्या सुमारास स्वतःच्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली. यानंतर गोळीचा आवाज येताच बेशुद्धवस्थेत असलेल्या डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत गंभीर जखमी असल्यानं यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. केवळ सोलापूर, महाराष्ट्रचं नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे. त्यांनी टोकाचे पाऊले का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केलं त्यांच्या त्याचं रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.. रुग्णालयात जेव्हा ही वार्ता कळाली तेव्हा सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांनी आयसीयू बाहेर प्रचंड गर्दी केली

डॉ. शिरीष वलसंगकर यांनी सोलापूर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतले आणि सन्मानाने पदवी प्राप्त केली. विज्ञानाची पूर्व-पदवी सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि प्री-प्रोफेशनल सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले.

त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. ते मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधू शकत होते

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !