टिप्पर पकडून त्यांना किनगावराजा पोलीस ठाण्यात जमा
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा तालुक्यातील रेती घाटाचा शासनाकडून लिलाव झालेला नसतांना मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवस रेतीचे उत्खनन सुरू आहे.
सविस्तर माहिती अशी की हिवरखेड पुर्णा, दुसरबीड, तढेगाव, पिंपळगाव कुडा येथे रेती उत्खननाचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. महसूल विभागाने दि.१ एप्रिल रोजी रात्री महसूल विभागाकडून नेमलेल्या पथकाने दुसरबीड येथे मलकापूर पांग्रा रोडवर दोन टिप्पर वर धडक कारवाई करत किनगावराजा पोलीस स्टेशनकडे जप्त करण्यात आले आहे.
तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू माफियांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. दि.१ एप्रिल रोजी रात्री दुसरबीडजवळ मलकापूर पांग्रा रस्त्यावर टिप्पर क्रमांक एमएच २८ विवि ५२२४ व टिप्पर क्रमांक एमएच २८ बिके ८१२१ दोन टिप्पर पकडून त्यांना किनगावराजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा