मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा, छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
छत्रपती संभाजीनगर पिशोर, ता कन्नड येथील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीचे अध्यापक डॉ. संजय गायकवाड यांना वक्तृत्व क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व लक्षात घेऊन मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरातील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, सुप्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बी. जी. गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कविता गायकवाड, तहसीलदार केशव मोहरकर, श्री संतोष तांबे यांची विशेष उपस्थिती होती.
व्यक्तिमत्व विकास, शिक्षणातून समृद्धीकडे, सारथी यशाचे, इंग्रजी असे शिकावे आणि निवडक महामानवांचे प्रेरणादायी जीवनकार्य हे त्यांच्या व्याख्यानाचे विषय होत. त्यांनी गाव, वाडी, तांडा, शाळा, महाविद्यालय आणि नगर- महानगरात आतापर्यंत हजारो व्याख्याने दिले आहेत. 'प्रबोधनातून राष्ट्राचे उत्थान' हा त्यांच्या व्याख्यानाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. या अगोदर महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासह त्यांना अनेक नामवंत पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. डॉ. गायकवाड यांचे बारा महत्त्वपूर्ण ग्रंथांचेही लेखन केले आहे.
डॉ. गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने समानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन हा पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी साहित्यिक प्रा. डॉ. शिवाजी हुसे, प्रा. पंजाबराव मोरे, डॉ. मनोज पवार, व्यंकटेश मैलापुरे, उपशिक्षणाधिकारी सिताराम पवार, दिलीप शिरसाठ, जयेश चौरे, संगीता सावळे, आशा डांगे, सुवर्णा देशमुख, सुनिता वाघ, सुनील आदिक, दत्ता मोरस्कर, रायभान जाधव, डॉ हबीब भंडारे, लक्ष्मण वाल्डे, ज्ञानेश्वर गायके यांसह शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा