स्वच्छता व सुरक्षेच्या कारणासाठी उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांचे आदेश
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर, (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
चैत्र यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांकडून नामदेव पायरी व मंदीर परिसरात नारळ फोडण्याने नारळाचे पाणी रस्त्यावर येवून चिखल व घसरंती होण्याची शक्यता आहे. तसेच विक्रेते नारळाची साल काढून मंदिर व मंदिर परिसराच्या बाजूस टाकल्याने केसरास आग लागण्याची शक्यता असल्याने. श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दि. 07 ते 09 एप्रिल 2025 या कालावधीत नारळ फोडण्यास व विक्री करण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा