चेअरमन विकास बेंगडे पाटील यांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
सोमवार दि ३१ मार्च रोजी झालेल्या ताळेबंदा २०२४ - २५ या आर्थिक वर्षात महागणपती मल्टिस्टेट संस्थेला ५ कोटी ७५ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन विकास बेंगडे पाटील यांनी दिली.
संस्थेच्या मार्च २०२५ अखेर ७७ कोटी २४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचे खेळते भांडवल १५२ कोटी ४१लाख रुपये आहे. संस्थेने कर्ज ५४ कोटी ३० लाख रुपये वाटप केले असून राखीव व इतर निधी रु. ३३ लाख रुपये आहे. संस्थेची गुंतवणूक १३ कोटी १८ लाख असून कायम मालमत्ता ६ कोटी २५ लाख रुपये आहे. संस्थेचे वसूल भाग भांडवल ५ कोटी ५९ लाख रुपये आहे , चेअरमन बेंगडे पाटील म्हणाले .
संस्थेने स्थापनेच्या कालावधी पासून सभासदांच्या विश्वासावर प्रगती केलेली आहे . सभासदांना घर बांधणी, व्यवसाय, स्थावर मालमत्ता खरेदी, वाहन खरेदी , गोरगरीब गरजू घटक, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, लघुउद्योग, होतकरू कामगार यांना आर्थिक प्रगती करता यावी , यासाठी संस्थेच्या माध्यमातून कर्ज वितरण करून आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.
खातेदार , ठेवीदार , सभासदांना अद्यावत कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, चेक क्लिअरींग सुविधा, एसएमएस सुविधांमुळे ग्राहकांना उपलब्ध करून दिल्याने सर्व माहिती तात्काळ मिळत आहे. तसेच संस्थेच्या सर्व शाखांमधून आरटीजीएस व एनईएफटी सुविधा सुरू करण्यात आल्याचे माहिती ही चेअरमन बेंगडे पाटील यांनी सांगितले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा