सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांचे आरोप
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर नगरपरिषद हद्दीतील सर्वे नंबर 327 व 328 मध्ये दिनांक 26 मार्च रोजी बेकायदेशीरपणे माती व मुरूम उत्खनन करून ती विटभट्टीला विक्री केली जात असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाड टाकून उत्खननासाठी वापरण्यात आलेले मशिन व हायवा जप्त करण्यात आलेले नसून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
परंतु, स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे की, या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. असे आरोप भारतीय बहुजन पालक संघाने केले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे दिले आहे. तसेच, या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही तर तहसील कार्यालयाबाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय बहुजन पालक संघाचे महाराष्ट्र राज्य संयोजक नाथाभाऊ पाचर्णे यांनी दिला आहे.
या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा