मुख्याध्यापिका भोसले आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आश्लेषा गाढवे यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
खंडाळा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथे नवीन शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू झाले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या धोरणानुसार सीबीएसई पॅटर्न इयत्ता पहिली साठी सुरू होणार असून शासनाच्या पीएम श्री आणि आदर्श शाळा या उपक्रमात शाळेची निवड झाली असलेने पहिलीच्या प्रवेशासाठी शाळेत लगबग सुरू झाली आहे.
अनुभवी शिक्षक वर्ग, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, संगीतमय परिपाठ, यशवंत प्रयोगशाळा, खगोलीय प्रयोगशाळा, आदर्श परसबाग, भरपूर क्रीडा साहित्य, ई लर्निंग सुविधा, मध्यान भोजन योजना, उपस्थिती भत्ता योजना, सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती, तसेच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, भव्य आणि दिमाखदार स्नेहसंमेलन, राष्ट्रीय दर्जाच्या व्याख्यानमाला, आरोग्य शिबिरे विविध योजना आणि वैशिष्ट्यांनी युक्त असलेली शाळा मागील काही वर्षांपासून नावारूपास आलेली शाळा आहे. या शैक्षणिक वर्षात परिसरातील पालकांनी इयत्ता पहिलीसाठीचा आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा असे आवाहन मुख्याध्यापिका भोसले आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आश्लेषा गाढवे आणि शिक्षक वर्ग यांनी केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा