maharashtra day, workers day, shivshahi news,

भू वैकुंठ पंढरी नगरीमध्ये सामुदायिक व्रतबंध (मुंज) सोहळ्याचे आयोजन

पेशवा युवा मंचच्या वतीने नाव नोंदणी करण्याचे आवाहन
Community Vratabandh (Munj), peshava yuva manch, maharashtra, shivshahi news,
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पेशवा युवा युवा मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे, यावर्षी सुध्दा सामुदायिक व्रतबंध  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.१ मे २०२५ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथील आरती प्रांगणामध्ये सामुदायिक व्रतबंध सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात होणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सानिध्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आपल्या पाल्याचा उपनयन सोहळा व्हावा अशी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच ब्राह्मण समाजाची इच्छा असते. त्यासाठी ब्राह्मण समाज प्रयत्नशील असतो. मात्र बदलत्या सामाजिक परिस्थितीत हा संस्कार करणे फार जिकिरीचे आणि आर्थिक ओढाताणीचे ठरत आहे. 
सर्वसामान्य व आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील बटूस भूवैकुंठ पंढरीमध्ये ब्रह्मचर्याचा संस्कार मिळावा आणि त्यासोबतच त्याच्या कुटुंबाची आर्थिक बचत व्हावी या दुहेरी हेतूने पेशवा युवा मंचने या भव्य समारंभाचे आयोजन केले आहे. या व्रतबंध सोहळ्यात सहभागी होणाऱ्या बटूस यज्ञोपवीत (जानवे) सोवळे, उपरणे, पळी, पंचपात्र, संध्येची पोथी मोफत देण्यात येणार आहे. बटू सोबत येणाऱ्या दहा लोकांची मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उपनयन संस्कारानंतर सर्व बटूंची वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये शहरातील समाज बांधवांनी सहभागी होत असतात.
या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यामध्ये बटूच्या पाल्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करावी. असे आवाहन पेशवा युवा मंचचे अध्यक्ष ज्ञानराज बेणारे व उपाध्यक्ष मंगेश कवडे यांनी केले आहे. आणि अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ९७६५२७७३२५ व ९८२२६१९०२० या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असे सांगितले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !