maharashtra day, workers day, shivshahi news,

समृद्धी महामार्गावर झोपेच्या डुलकीने घेतला अजून एक बळी - अपघातांची मालिका थांबेना

आयशर गाडीची साईड बोर्डला धडक, चालक जागीच ठार 

Accident on Samruddhi mahamarg, dusrBeed, sindkhedraja, Buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)

समृद्धी महामार्गावर दिनांक 28/ 4/ 2005 रोजी मध्यरात्री 2.20 व दरम्यान दुसरबीड टोल नाक्याजवळील चायनैज नंबर 317.3 नागपूर कॅरिडोर वर आयशर क्रमांक MH- 20-EG-5075 हे बिडकीन जिल्हा संभाजीनगर येथून नागपूरच्या दिशेने जात असताना चालक गणेश गायकवाड व 40 वर्ष बिडकीन जिल्हा संभाजीनगर यांना सदर टोल नाक्याजवळ दुसरबीड इंटरचेंज जवळील IC-12 असा बोर्ड महामार्गाच्या साईडला लावलेला आहे. झोपेची डुलकी लागल्याने सदर आयशर अनियंत्रित होऊन बोर्डच्या लोखंडी पोल ला जोरदार धडक दिल्याने चालक गणेश गायकवाड जागेवरच ठार झाला व बाजूला बसलेले मच्छिंद्र क्षीरसागर रा.पांग्रा जिल्हा संभाजीनगर हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याची माहिती मिळताच तात्काळ समृद्धी महामार्गावरील यंत्रणा  108 ॲम्बुलन्सचे डॉक्टर यासीन शाहा व मंगेश काळे ,चालक सुभाष पांचाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ जखमेवर प्राथमिक उपचार केला. 

तसेच QRV टीम दुसरबीड येथील श्रीकृष्ण बच्छिरे , तुषार तांदळे, नितीन बीसेन व पवन काळे यांनी सदर आयशर मधील अडकलेले मृतक यांना कटरच्या साह्याने पत्रा कट करून बाहेर काढले. व महामार्ग पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल रोशन शेख ,संदीप किरके, अरुण भुतेकर  व महाराष्ट्र सुरक्षा बल चे जवान पवन सुरुसे , जयकुमार राठोड यांनी सदर अपघात ग्रस्त आयशर क्रेनच्या साह्याने महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. व सदर मृतक व जखमी यांना पुढील उपचारा कामी सिदंखेडराजा येथे रवाना केले .सदर घटनास्थळी पोलीस स्टेशन किनगाव राजा चे अधिकारी व अमलदार हजर आले असून पुढील कारवाई करीत आहे. 

समृद्धी महामार्गावर वाहन चालकांनी वाहन चालवताना शक्यतो दोन चालक सोबत घेऊनच वाहन चालवावे व पुरेशी विश्रांती व झोप घ्यावी .जेणेकरून एका चालकाला झोप आली तर दुसरा चालक वाहन चालू शकतो त्यामुळे होणारे अपघात ठळू शकतील त्याबाबत महामार्ग पोलीस चे प्रभारी अधिकारी API संदीप इंगळे. व स्टॉप हे सदर बाबत दररोज चालक व प्रवासी यांना सदर बाबत प्रबोधन करीत आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !