धरणातील जलसाठा वाढून टिकाऊ जलव्यवस्थापनास मदत
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत "गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना आमदार प्रा.रमेश बोरनारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यात मतदारसंघातील 14 गावातील 22 धरणांना मंजुरी मिळाली असून "गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार" योजनेचा शुभारंभ चिकटगाव येथे आमदार प्रा.रमेश पा.बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या योजनेंतर्गत धरणातील जलसाठा वाढून टिकाऊ जलव्यवस्थापनास मदत होते आणि गाळयुक्त शिवार अंतर्गत जमिनीची सुपीकता वाढवून शेती उत्पादनातही चांगली वाढ होते. सिंचन आणि पिण्याचे पाणी हे धोरण हाती घेतले आहे, थोड्या दिवसात "मराठवाडा ग्रीड" योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. शेतीच्या सिंचनासाठी प्रत्येक गावातील शेतकरी, सरपंच, चेअरमन यांनी गावात गावातील नाला खोलीकरण, गाळमुक्त धरण, सिमेंट बंधारे करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार रमेश बोरणारे यांनी केले.
यावेळी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी सभापती भागिनाथ मगर, डॉक्टर राजीव डोंगरे, संचालक गोरख आहेर, प्रकाश वाघ, राजेंद्र निकम, उत्तम निकम, माजी उपसभापती आनंद निकम, उपविभागप्रमुख अरुण मगर, प्रशांत शिंदे, गणेश आहेर, दीपक वाघ, गजानन निकम, संजय कुंदे, समाधान सूर्यवंशी, भाऊसाहेब निकम, पुंजारी पाटील, बि.के.जाधव, राधाकृष्ण सोनवणे, चांगदेव निकम, बाबासाहेब सोनवणे खरजकर, कैलास पाटील, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन जाधव, उपाध्यक्ष योगेश हिरे, सचिव अरुण भाऊ सोनवणे, ज्ञानेश्वर तांबे, किशोर मगर, किरण निकम व पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रगत शेतकरी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण सोनवणे यांनी सांगितले तर आभार प्रदर्शन उत्तम निकम यांनी मानले
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा